फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला CM शिंदेंचं प्रत्युत्तर

फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला CM शिंदेंचं प्रत्युत्तर

Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Budget session) सुरू होत आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर जोरदार टीका केली. खोके सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे, अशा शब्दात त्यांनी सरकावर हल्लाबोल सकेला. त्यांच्या या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिलं. फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का, असा खोचक टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

पोंक्षे पिता-पुत्रांच्या चित्रपटाचे नाव जाहीर; काय जबरदस्त घेऊन येणार? प्रेक्षक उत्सुक 

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आज जनतेनं आम्हाला विरोधकांपेक्षा जास्त मतं दिली. विरोधकांचा स्ट्राइक रेट ४२ टक्के आहे तर आमचा स्ट्राइक रेट ४७ टक्के आहे. हे मी छातीठोकपणे सांगतो. घरी बसलेल्यांना लोक मत देत नाहीत. जे मैदानात उतरून काम करतात, त्यांना लोक मतदान करतात. काही लोक म्हणाले की, हे निरोपाचं अधिवेशन आहे. आता निरोप देण्यासाठी सभागृहात तर यायला पाहिजे ना? की, फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार? निरोप घ्यायचा की द्यायचा हे जनता ठरवत असते, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

शिक्षकांच्या भावी आमदाराचं भवितव्य मतपेटीत, नाशिक शिक्षक मतदारसंघात 93.48 टक्के मतदान 

फडणीस म्हणाले की, आज विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकत पत्र दिलं. खोटं बोलं पण रेटून बोल हे त्यांचं धोरणं. खोटं बोलून निवडणुकीत मतं मिळाल्याने आता खोटचं बोलायचं या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला. त्यांनी दिलेलं पत्र एका वाक्यात सांगायचं तर आरशात त्यांनी आपला चेहरा पाहिला पाहिजे, अशी टीका फडणवीसांनी केली.

अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील एकही श्लोक नाही….
तर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील एकही श्लोक समाविष्ट करण्यात आला नाही. मनुस्मृतीला राज्य सरकारचं समर्थन नाहा. मनुस्मृतिसारख्या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान नाही हे विरोधकांना माहीत आहे, तरीही विरोधक जाणीवपूर्वक असे मुद्दे उपस्थित करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे राजकारण करणे योग्य नाही, ते महाराष्टाला परवडणारं नाही, असं अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज