Road Accident : शहाजीबापूंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, एकाचा मृत्यू

Untitled Design   2023 02 09T172942.482

सोलापूर : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ते प्रसिद्ध झाले ते ‘ काय झाडी… काय डोंगार… काय हाटील’ या डायलॉगने. याच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरा, माळवाडी येथे झाला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला एका दुचाकीने चुकीच्या दिशेने धडक दिली. यामुळे हा अपघात झाला.

हेही वाचा : चिंचवड निवडणुकीत वाढला सस्पेन्स; अजित पवार म्हणाले…

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याने आमदार शहाजीबापू पाटील शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम आटोपून ते सांगोला शहराकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांनी संरक्षक गाडी होती.

त्यांचा ताफा माळवाडी, नाझरा येथे आला असता त्याच आमदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकीस्वार येवून चढल्याने गंभीर अपघात झाला. अपघातातील जखमीस उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा अपघात घडताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Tags

follow us