Lok Sabha Election : नगरमध्ये एका हॉटेलमध्ये रोकड पकडली, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
राहुल बबन झावरे (रा. पारनेर), अनिकेत राजू यादव (रा. भिंगार, अहमदनगर), विलास गोविंद चिबडे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगरः लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगता येत नाही. निवडणुकीत पैशाच्या गैरवापर होऊ नये म्हणून याचा शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून जास्तीची रक्कम जप्त केली जाते. अहमदनगर शहरामध्ये अशी कारवाई करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये 60 हजार रुपयांची रक्कम पकडण्यात आली. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.
काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर! मुंबई उत्तरमधून भूषण पाटील लोकसभेच्या मैदनात
सोमवारी रात्री या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहुल बबन झावरे (रा. पारनेर), अनिकेत राजू यादव (रा. भिंगार, अहमदनगर), विलास गोविंद चिबडे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील कायनेटिक चौक भागातील हॉटेल यश ग्रॅंड या हॉटेलमधील एका रुममध्ये तिघे थांबले होते.
मग तुम्ही साडेसतरा वर्ष गप्प का बसले?, भरसभेत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल
या हॉटेलमध्ये पोलिसांनी तपासणी केली. त्यात तीन पाकिटामध्ये प्रत्येकी वीस हजार रुपयांची 60 हजार रुपयांची रोकड आढळून आली. पाचशे रुपयांच्या 120 नोटा होत्या. या पैशांबाबत तिघांना योग्य ते कारण देता आले नाही. त्यामुळे पोलिस कॉन्स्टेबल सतिष मारुती शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.