मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या, CM शिंदे तातडीने नागपूरहून मुंबईला

मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या, CM शिंदे तातडीने नागपूरहून मुंबईला

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)तातडीने मुंबईहून नागपूरला रवाना झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याचं नागुपरात आगमन झाल. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपतींचे स्वागत केले. त्यांनी राष्ट्रपतींना राजभवनात सोडले. यानंतर मुख्यमंत्री तातडीने मुंबईला रवाना झाले. (Chief Minister Eknath Shinde hastily left for Mumbai from Nagpur)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूर आणि गडचिरोलीला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी ७ वाजता नागपूरात आल्या. उद्या (५ जुलै) ला सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आणि कोराडी येथील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. नक्षलग्रस्त गडचिलोरीत जिल्ह्यात येणाऱ्या त्या पहिल्याच राष्ट्रपती ठरणार आहेत. दम्यान, राष्ट्रपतींचे नागपुरात आगमन होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, दोन्ही गटांनी बजावला व्हीप; आमदारांंची गोची 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नागपूरात थांबणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना राजभवनात सोडल्यानंतर ते तातडीने मुंबईला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवारांनी काही आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या प्रवेशाने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

मविआमध्ये असतांना अजित पवारांना कंटाळून ते सरकारमधून बाहेर पडत असल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितलं होतं. निधी वाटपातही दुजाभाव झाल्यामुळं शिवसेनेची कामे थांबली असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, आता अजित पवार सत्तेत सहभागी झाले. ते नुसतेच सत्तेत सभागी झाले नाही, तर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर NCP ला मिळणारी संभाव्य यादीही जाहीर झालाी. त्यामुळं शिंदे गटाला डावलून राष्ट्रवादीला मंत्रीपदे मिळत असल्यानं शिंदे गटाच्या आमदारांत नाराजी पसरली. शिवाय, अजित पवारांकडे अर्थ व वित्त खातं असण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुख्यमंत्री तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube