माझ्या मताशी अजितदादाही सहमत… अहवालातील दोषींवर कारवाई होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Chief Minister Fadnavis यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांनी खरेदी केलेल्या जमीनीचा व्यवहार रद्द झाला तरी कारवाई होणार असा इशारा दिला
Chief Minister Fadnavis warns for action on culprits in Mundhava Land Purchase : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून होत होता. त्या आरोपांनंतर चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे, तर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला असल्याची माहिती दिली. मात्र तरी देखील या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. दोषींवर देखील कारवाई होणार आहे. असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणाची रजिस्ट्री रद्द झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, रजिस्टर रद्द झाली तरी देखील कारवाई होणार असल्याचा इशारा दिला. दोन्ही पक्षांनी ही रजिस्टर रद्द करण्याचा अर्ज केला आहे. मात्र असा अर्ज जरी केला असला तरी देखील गुन्हेगारी प्रकरण संपलेले नाही. त्यामुळे त्या संदर्भातील ज्या काही अनियमितता आहेत. त्यासाठी जो कोण जबाबदार असेल. त्याच्यावर पुढची कारवाई होईल. माझ्या या मताशी उपमुख्यमंत्री श्रीमान अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील. त्यामुळे अहवालात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई होईल. असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला.
सर्व व्यवहार रद्द, अजित पवारांची माहिती
आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही, मला या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही असंही अजित पवार म्हणालेत. दरम्यान, पुढे बोलताना या व्यवहारामध्ये एकही रुपया आतापर्यंत कोणालाही देण्यात आलेला नाही, असा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सर्व दस्त देखील रद्द करण्यात आले आहेत, तसंच चौकशीसाठी समिती देखील गठीत करण्यात आली आहे, महिनाभरात या प्रकरणातील अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.
