मोठी बातमी: पुण्यात नवीन मेडीकल कॉलेज होणार; MBBS च्या 50 जागांवर प्रवेश, फडणवीसांची घोषणा!

CM Devendra Fadnavis announces 50 MBBS seats; पुण्यातील ईएसआयसी (ESIC) वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या 50 जागांवर प्रवेश घेता येणार आहे.

CM Devendra Fadnavis announces 50 MBBS seats at Pune ESIC Medical College

CM Devendra Fadnavis announces 50 MBBS seats at Pune ESIC Medical College: पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील ईएसआयसी (ESIC) रुग्णालयाचे मेडीकल कॉलेजमध्ये रुपांतर करुन तेथे एमबीबीएसच्या 50 जागांवर प्रवेश घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या जागांना मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; रिलायन्स पॉवरची 2,032 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. आगामी विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेल्या मंजुरीची माहिती दिली.

दोनदा प्रस्ताव फेटाळला, अखेर मंजुरी

पुण्यातील ईएसआयसी रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) यापूर्वी दोनदा हा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर राज्य सरकारने केंद्रीय स्तरावर अपील केले होते. या अपिलाला आता मंजुरी मिळाली असून, एमबीबीएसच्या 50 जागांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

IDBI Bank विक्रीचा मार्ग मोकळा; केंद्र सरकार आणि LIC चा 52,877 कोटींचा व्यवहार, कॅनडाच्या कंपनीला मालकी

या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या मंजुरीमुळे पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

एमपीएससीचा कारभार पारदर्शक करण्यावर भर

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या कामकाजाबाबतही भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळात आगीच्या झळा! बीड जिल्ह्यात गंजीला आग लागून सोयाबीनची राखरांगोळी

आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, व्ही. राधा समितीच्या माध्यमातूनही संबंधित बाबींचा आढावा घेतला जात आहे. दरवर्षी अधिकाधिक पदांची भरती व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची आगाऊ मदत

दुष्काळी परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची माहिती दिली. मदत वाटपात तांत्रिक अडचणींमुळे कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने 12 उपाययोजना सुरू केल्या असून, त्यांचा लाभ राज्यातील दुष्काळग्रस्त भागांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचे आवाहन

यंदा दुष्काळामुळे ऊसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम कमी कालावधीचा ठरू शकतो, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे कारखान्यांनी शक्य तितक्या लवकर गाळप सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले.

फेरमतमोजणीचं मूळ व्हिडीओ रेकॉर्डिंग कुठं गेलं?, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कारखानदार आणि संबंधित घटकांनी सामंजस्याने निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (FRP) मिळण्याच्या दृष्टीनेही योग्य भूमिका घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

follow us