मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा; CM शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा; CM शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Eknath Shinde : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी सभापती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. या सर्वांचे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे पिता-पुत्रांवर टीका करत खासदार श्रीकांत शिंदेंचा (Shrikanth Shinde) उल्लेख कारटं असा केला. त्या टीकेला आता सीएम एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे…; रावसाहेब दानवेंचा खोतकरांना इशारा 

मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा, असे आव्हान एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केलं.

छत्रपती संभाजी नगरमध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या आरोपांना आम्ही उत्तर देणार नाही. आम्ही कामातूनच उत्तर देत आलो आणि आताही कामातूनच देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे ते बिथरले आहेत, लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना धडकी भरलीये, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे, असं शिंदे म्हणाले. पुढं बोलतांना ते म्हणाले, लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा ना, असं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं.

नवरात्र उत्सव; दांडीया स्पर्धेला कोपरगावात अभिनेत्री मानसी नाईक हजेरी लावणार 

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
दिपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आता त्या ठिकाणी जे खासदार आहे, मुख्यमंत्र्यांचं कार्ट. लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात पैसा ओताला. सत्तेचा गैरवापर करण्यात आला. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या विरोधात प्रचार करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिथं यावं लागलं. मात्र, तरी देखील कल्याण-डोंबिवलीकरांनी सुमारे चार लाख मते आपल्या भगव्याला दिली. आता तुमची सर्वांची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आज उद्धव ठाकरेंनी शिंदे म्हात्रे यांना पक्षात प्रवेश देऊ शिंदे सेनेला मोठा धक्का दिला. मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार आदित्य ठाकरे, विनायक राऊत, वरुण सरदेसाई, कल्याण संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर आदी नेते उपस्थिती होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube