‘सरकारी काम, सहा महिने थांब…आम्ही मागे सारलं’; CM शिंदेंची जळजळीत टीका

‘सरकारी काम, सहा महिने थांब…आम्ही मागे सारलं’; CM शिंदेंची जळजळीत टीका

Cm Eknath Shinde : सरकारी काम सहा महिने थांब आम्ही मागे सारलं असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. यवतमाळमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील असून शेतकरी आपले मायबाप आहेत. शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सोलर मशीनचं वाटप, त्यामुळे सरकारी काम सहा महिने थांब आम्ही मागे सारलं असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील

तसेच राज्यात 75 मॉडेल स्कूलला मान्यता सरकारने दिली आहे , शिक्षण विभाग चांगलं काम करतंय तसेच यवतमाळ समृद्धी महामार्गाला जोडणारं काम होणार असून दीड लाखांच्या योजना पाच लाखांपर्यंत राज्य सरकारने आणल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना एसटीमध्ये सवलती दिल्या आहेत. शेतकरी संकटात येऊ नये, म्हणून आम्ही काम करतोयं. आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी सरकार जबाबदार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Rahul Narvekar यांनी घेतला कायदेशीर सल्ला; आजच्या सुनावणीत न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विरोधकांवर निशाणा साधून टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याआधीही अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. विशेष म्हणजे याप्रसंगी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते.

Manoj Jarange : मनोज जरागेंचं सरकारला आवाहन म्हणाले, आता सरकारने…

ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या माध्यमातून अनेक नेते एकत्र आले आहेत. याआधीही 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी विरोधकांकडून अनेकदा प्रयत्न झाले आहेत. पण विरोधक मोदींना हरवू शकलेले नाहीत. आता 2024 साली देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube