‘…म्हणून विरोधकांची पोटदुखी, धडकी भरतेयं’; CM एकनाथ शिंदे बरसले
Cm Eknath Shinde : शासन आपल्या दारी कार्यक्रमांमुळे विरोधकांना पोटदुखी आणि धडकी भरत असल्याचं म्हणत मुख्यमंत्र एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) विरोधकांवर बरसले आहेत. दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन रायगडमधील लोणेरेमध्ये पार पडला. या कार्यक्रमात कोकणातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भरत गोगावले, अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत बोलत होते.
Merry Christmas: ‘मेरी ख्रिसमस’ च्या रीलीजपूर्वी विजय सेतुपतीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात लोकं शासनाच्या योजनांच्या लाभासाठी अनेक चक्करा मारत होते. सरकारी योजनांसाठी लोकांना सरकारी कार्यालयात जावं लागत होतं, पण महायुती सरकारच्या काळात आम्ही दारात जात लाभ देत आहे. सरकारी काम अन् सहा महिने थांब हा शब्दच आम्ही काढून टाकला असून राज्यातील 2 कोटी 19 लाख लोकांना योजनांचा लाभ दिला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच महायुती सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे अनेकांना पोटदुखी होते. त्यामुळे त्यांच्याकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम करत आहेत. या कार्यक्रमामुळे विरोधकांना धडकी भरते पण आम्ही आमचं काम सुरुच ठेवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे. मागील 60 वर्षांत जे नाही झालं ते कामं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 वर्षांत केली आहेत.. देशात मोदी है तो मुमकीन है… या शब्दांत मोदींबद्दल शिंदेंनी गौरवोद्गार काढले आहेत.
रामायण मालिकेतल्या सीतेची पंतप्रधान मोदींना विनंती; म्हणाल्या, “अयोध्येच्या मंदिरात प्रभू …”,
राम मंदिर बाळासाहेबांचं स्वप्न :
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासह देशातील तमाम जनतेची इच्छा होती. पण काही लोक टिंगल करीत होते, मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे असं म्हणत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी रामाचं मंदिर बनवून तारीखही सांगितली असल्याचा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी लगावला आहे.
चार राज्यांत मोदींचीच गॅरंटी :
काही दिवसांपूर्वीच देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये इतरांनी जनतेला अनेक गॅंरटी देऊन पाहिली, पण चारही राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच गॅंरटी चालली असल्याची टोलेबाजीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केली आहे.