बाप चोरला म्हणता ‘बाळासाहेब’ वस्तू होते काय? CM शिंदेंनी ठाकरेंना खडसावलंच

बाप चोरला म्हणता ‘बाळासाहेब’ वस्तू होते काय? CM शिंदेंनी ठाकरेंना खडसावलंच

Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : माझा पक्ष चोरला, बाप चोरला म्हणता बाळासाहेब वस्तू होते काय? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांना खढसावलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्यावतीने जनसंवाद यात्रा सुरु आहे. यात्रेच्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अजितदादांनी हेरला लोकसभेचा प्रमुख शिलेदार : धनंजय मुंडेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी असंगाशी संग केला तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत, माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, असं लहान मुलगा कसा आपलं खेळणं चोरलं, खेळणं चोरलं म्हणत असतो याला काय म्हणावं बाळासाहेब चोरायला ते काय एक वस्तू होते का? ते एक विचार होते, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

प्रिया दत्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा सिद्दिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजितदादांच्या विधानाने खळबळ

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
माझा पक्ष चोरला, माझा पक्ष देऊन टाकला. माझं वैभव घ्यायची लायकी नाही तुमची पात्रता नाही. या भगव्याला ज्यांनी कलंक लावलेला आहे. शिवरायांचा खरा भगवा तो आम्ही लाल किल्ल्यावर फडकवून दाखवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

https://www.youtube.com/watch?v=uzlBFq-Ex6I%E0%A5%8B

दरम्यान, चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं असल्याची बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. शिवसेनेसारखाच निकाल काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतीत दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube