Maharashtra Assembly Election : सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; नाना पटोलेंचे संकेत काय?
Congress Candidate List : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून अद्यापही महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचं दिसून आहे. एकीकडे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं, तर दुसरीकडे काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार, याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं असून उद्या रात्री काँग्रेसची यादी होणार असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
“मनापासून प्रयत्न केल्याने मला…,” ‘गुम है किसीके प्यार में’फेम रजतने मराठी शिकण्याचा अनुभव केला शेअर
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये थोड्या जागांवरुन घोळ सुरु आहे, हा घोळ आज निकाली काढायचा असून त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांची यादी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर रात्री उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय.
सरकार घालवण्यासाठी जनता सुसज्ज ; इस्लामपूरमधून शक्तिप्रदर्शन करत जयंत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
तसेच जागावाटपाच्या मुदद्यावरुन महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही अडचणी सुरु आहेत. आघाडी युती असली की अडचणी येतच असतात. हे राजकारणामध्ये सुरुच असतं, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. तर माझा स्वत:चा उमेदवारी अर्ज जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर अखेरच्या दिवशीच भरणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.
सावधान! प्रदूषणामुळे होतोय डोळ्यांचा ‘हा’ आजार; काळजी घ्या, डोळ्यांचं आरोग्य जपा
भ्रष्टाचारी व्यवस्थेला सत्तेतून काढणं आमचं धर्म…
राज्यात जे भ्रष्टाचारी सरकार आलंय. त्या सरकारचे पुण्यात पाच कोटी सापडले आहेत. पैसे सापडल्यानंतर खोक्यावाल्यांकडेच इशारा गेला आहे. महाराष्ट्राला विकून निवडणूक लढवायची त्यातही वाचलेला महाराष्ट्र पुन्हा लुटायचा, भ्रष्टाचारी व्यवस्था महाराष्ट्रात आहे. आत्तापासूनच सत्ताधाऱ्यांचे पैसे सापडायला लागलेत. आम्हाला महाराष्ट्र वाचवायचा आहे जमीनी सरकारने लिलावाल काढल्या आहेत, राज्याला विकणाऱ्या व्यवस्थेला सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा धर्म असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.