CM शिंदे फक्त मुखवटा, महायुती सरकारवर भाजप अन् संघाचा कंट्रोल; पटोलेंचा दावा
Nana Patole: राज्यात सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची (Vidhansaba Election) जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. अशातच आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) भाजपवर जोरदार टीका केली. राज्यात सत्तेवर असलेले महायुती सरकारवर भाजप आणि आरएसएसचा (RSS) कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.
Manoj Jarange Patil : जरांगे पाटील सोमवारी नगर शहरात, असे असेल महारॅलीचे नियोजन
आज लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलतांना पटोले म्हणाले की, महायुती सरकारवर भाजप आणि आरएसएसचा कंट्रोल आहे. एकनाथ शिंदे हे फक्त मुखवटा आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला, पण त्यांनी हा गुलाल का उधळला हे जाहीर केलं नाही. जरांगे पाटील व त्यांच्यात काय चर्चा झाली हे आम्हाला माहीत नाही. सर्व पाप सरकारने करायचं आणि खापर विरोधी पक्षावर फोडायचं हा त्यांचा अजेंडा आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी रोखले, असा सवाल पटोलेंनी केला.
तुमचं मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी अन् घेतलेल्या सुपाऱ्या…; अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
भाजप भांडणं दोन समाजात भांडणं लावतंय…
या सरकारला आरक्षण द्यायचं नाही, तर दोन्ही समाजात भांडणे लावायची आहे. फोडा आणि राज्य करा, हे ब्रिटीशांचे धोरण भाजप अवलंबत आहे. मनुवादी व्यवस्था हवी की शाहू, फुले आंबेडकरांचा विचार हवा, याचा विचार जनतेनं करायचा आहे, असं पटोले म्हणाले.
महायुतीचा सुफडा साफ करा
पटोले पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीने मराठवाड्यात एक जागा जिंकली. मात्र विधानसभा निवडणुकीला मराठवाड्यातून महायुतीचा सुफडा साफ करा, असं आवाहन करत विधानसभा निवडणुकीत मविआ 185 हून अधिक जागा जिंकेल आणि काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला.
वडेट्टीवार काय म्हणाले?
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं म्हणणाऱ्या भाजपने हा महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला. मुंबईतील 10 लाख कोटींची जमीन अदानीच्या घशात घालण्याचे आणि मुंबई साफ करण्याचं पाप राज्यातील हे त्रिकूट करत आहे. बदमाश, लुटारू, चोर, दरोडेखोरांचे हे सरकार सध्या महाराष्ट्राच्या बोकांडी बसले, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.