दामगुडे अन् हनुमंत पवार यांच्यातील वाद नेमका काय? हाणामारीमागे पडद्यावरची ‘चर्चा’ ठरली खरं कारण

तुषार दामगुडे आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यातील पुण्यात झालेल्या हाणामारी प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

  • Written By: Published:
दामगुडे अन् हुनमंत पवार यांच्यातील वाद नेमका काय?; हाणामारीमागे पडद्यावरची 'चर्चा' ठरली खरं कारण

Tushar Damgude & Hanumant Pawar Fight : हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यातील पुण्यात झालेल्या हाणामारी प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पण, दामगुडे यांनी थेट अंगावर धाऊन जात मारहाण करणं किंवा धमकी देण्यापर्यंत असं नेमकं काय घडलं? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचाच घेतलेला हा मागोवा…

राज्यसभेचा रणसंग्राम! भाजपचे संभाव्य नावं समोर, शिंदेंचा दे धक्का, आघाडीत बिघाडी कायम

तर…दमागुडे यांनी थेट पवार यांना मारहाण करण्यामागे एका टीव्हीशोमधील चर्चा सत्रात झालेल्या वादग्रस्त आणि आवार्च भाषाची किनार आहे. पवारांनी दामगुडे यांना उद्देशून बोललेल्या शब्दांपासून या वादाला सुरूवात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना समकक्ष मानावे असे विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होऊन गेले असे सांगून त्यांनी विखारी विषारी विचारणा जवळ केली नाही. त्यामूळे शौर्याचे लक्षण म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले होते.

सपकाळ यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. एवढेच काय तर, पुण्यात भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांध्ये वाद झाला होता. सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानंतर एका मराठी वृत्तवाहिनीवर आयोजित चर्चासत्रात विविध मान्यवरांसह दामगुडे आणि पवार सहभागी झाले होते. त्यावेळी दामगुडे यांनी टीव्ही चर्चांमध्ये सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांची तुलना जिहादी शासक टिपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप करत त्यांची बाजू ठामपणे मांडली. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

चर्चेवेळी दामगुडे यांनी छत्रपती शिवरायांची जिहादी टिपूशी तुलना करणे, महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान असल्याची बडबड करून स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या त्यागाची उपेक्षा करणे आदी मुद्दे मांडत हे सर्व कशासाठी? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. पण, त्याचवेळी पवार यांनी मूळमुद्दा बाजूला ठेवत वैयक्तिक पातळी सोडून देत दामगुडे यांना आवर्च्य भाषेत बोलण्यास सुरूवात केली. त्यामुळे शाब्दिक वाद आणखीन चिघळला.

मुंबईतील अब्जावधी रुपयांच्या जमिनी अदानीच्या घशात, मंत्रालय व विधिमंडळ कधी देणार? हर्षवर्धन सपकाळ भडकले

त्यानंतर काल (दि.23) पुण्यात एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी दामगुडे आणि पवार समोरासमोर आले होते. कार्यक्रम संपल्यावर सुरुवातीला दामगुडे बाहेर पडले. त्यानंतर फोनवर बोलत पवारही बाहेर आले. त्यावेळी मित्रमंडळ चौकाजवळ आधीच फुटपाथवर बाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांना आवाज देऊन बोलावलं आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली. या सर्वांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर अवघ्या काही सेकंदात एकमेकांना लाथाबुक्या घालेपर्यंत जाऊन पोहोचलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेंसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एकूणच काय तर, सपकाळ यांनी टिपू सुलतानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला हवे असे विधान केले या वादग्रस्त विधानावरील चर्चेवेळी पवार यांनी दामगुडे यांना उद्देशून अपशब्द उच्चारले तेव्हापासून पवार आणि दामगुडे यांच्यात वादाला तोंड फुटलं आणि शब्दांपासून सुरू झालेला वादाचा शेवट पुण्यात थेट पवार आणि दामगुडे एकमेकांच्या अंगावर जाईपर्यंत पोहोचला.

follow us