मला मुख्यमंत्री करणार असं सांगितलं असतं तर पक्षच…; अजितदादा थेटच बोलले

मला मुख्यमंत्री करणार असं सांगितलं असतं तर पक्षच…; अजितदादा थेटच बोलले

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जर मला मुख्यमंत्री करणार असं सांगितलं असतं, तर संपूर्ण पक्षाच घेऊन आलो असतो, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

IND vs SL: गंभीर – रोहितला धक्का, 27 वर्षांनंतर श्रीलंकेने जिंकली मालिका

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे आज गडकरी रंगायतन येथे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, शंभूराज देसाई आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, ठाणे या ऐतिहासिक शहरात बरंच काही घडलंय. सामान्य नागरीक ते मुख्यमंत्री असा प्रवास एकनाथराव शिंदे यांनी केला. फडणवीस यांची टर्म 1999 साली सुरू झाली. एकनाथ शिंदे यांची कारकीर्द 2004 मध्ये सुरू झाली. मी यांच्या आधीचा आहे, हे सर्व पुढे गेले, मी तिथंच राहिलो, असं अजित पवार म्हणाले.

बांगलादेशात जे घडतंय ते भारतातही होऊ शकतं; सलमान खुर्शीद यांचा खळबळजनक दावा 

शिंदे-फडणवीस पुढे, मी तिथंच…
मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो मला जर मुख्यमंत्री करणार असं बोलले असते, तर संपूर्ण पक्षच सोबत आणला असतो. त्यांनी तर फक्त आमदारच आणले. आता वेळ निघून गेली आहे, अशी मिश्कील टिप्पणी अजितदादांनी केली. माझे फडणवीस-शिंदे यांचे संबंध पूर्वीपासून चांगले आहेत, असंही ते म्हणाले.

कोण ढेकून म्हणतय, कोणी काय म्हणतोय ही महाराष्ट्राची परंपरा नाही. सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना मी विधिमंडळात गेलो. बरेच मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे लोकांच्या गराड्यात राहणारे मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे आहेत. वसंतराव नाईकांपासून ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सर्वाधिक जास्त सह्या करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, अशा शब्दात अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं.

…म्हणून माझे फोटो येत नाहीत
मलाही शेतीची आवड आहे. पहाटे सहा वाजता शेतात जातो. पण माझ्याकडे एकनाथराव यांच्याऐवढे फॉलोअर्स नसल्याने माझे पोटो येत नाहीत. मी बारामतीला जातो तेव्हा पहाटले सहा वाजता शेतात जातो. पण, मीडिया आमचा चाहता नसल्याने आमचे फोटो, व्हिडिओ येत नाहीत, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube