राहुल गांधी बेजबाबदार, घातपात करायचा होता का? एकनाथ शिंदेंचा थेट सवाल…
राहुल गांधी बेजबाबदार, घातपात करायचा होता का? असा थेट सवाल दिल्लीतील आंदोलनावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं, घातपात करायचा होता का? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दिल्लीत नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काल संसदेवर मोर्चा काढण्यात आला. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह कॉंग्रेस खासदार राहुल गांधी आणि विद्यार्थ्यांचा ताफा थेट संसदेकडे निघाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या संपूर्ण घडामोडींवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलंय.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर असताना राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केलं ते अतिशय बेजबबदार पद्धतीचं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
तसेच ज्या ठिकाणी कोणी आंदोलन करू शकत नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून, म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं? पंतप्रधानांच्या निवासस्थानी तुम्हाला काही घात पात करायचा होता का? तुमच्या मनामध्ये काय होतं? या देशात अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? असाही थेट सवाल शिंदेंनी केला आहे.
नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करताना राहुल गांधी यांना पोलिसांनी फरफटत नेलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अमानूषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार गांधी यांनी परिषदेतून पंतप्रधान मोदी यांनी माफी मागून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीयं.