महायुतीच्या काळात एकही पेपरफुटीची घटना घडली नाही, फडणवीसांचा दावा; ‘खोटं असेल तर हक्कभंग…’
Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात (Vidhansabh Adhiveshan) राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पेपरफुटीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उत्तर देताना फडणवीसांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या काळात एकही पेपरफुटीची (Paper Leak) घटना घडली नसल्याचा दावा करत आपण चुकीच सांगत असून तर माझ्यविरोधात हक्कभंग आणा, असं आव्हान दिलं.
Manipur Violence : ‘मणिपूरचा इतिहास समजून घ्या’; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं…
देवेंद्र फडणवीस यांनी अभिभाषणावर बोलतांना विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा आणि आक्षेपांचा खरपूच समाचार घेतला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, नोकरी भरतीचा मुद्दा इथं मांडल्या गेला. या सरकारने भरती पारदर्शकपणे करून नोकरभरतीचा विक्रम केला आहे. आम्ही 75 हजार पदे भरण्याचे जाहीर केलं होतं. त्यापैकी 57 हजार 452 जणांना नियुक्ती आदेश दिले आहेत. 19,853 जणांनी परीक्षा वगैरे सगळं झालं. पुढच्या महिनाभरात त्यांना नियुक्तीचे आदेशही दिले जातील. म्हणजे, एकूण 77 हजार 305 जणांना नोकऱ्या देण्यात आल्या, असं फडणवीस म्हणाले.
Mirzapur 3 : ‘मिर्झापूर -3’ची काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या…
पुढं ते म्हणाले, पुढच्या तीन महिन्यांत 31 हजार 201 पदांवरील नियुक्ती आदेशांचे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे आपल्या सरकारने पुढील तीन महिन्यांत 1 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचा विक्रम करेल. या पदांची भरती करत असतांना पेपरफुटीची एकही घटना घडलेली नाही, तुम्ही वर्तमानपत्राच्या बातम्यावर जाऊ नका. मी अधिकृत सांगतोय, हे खरं नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा, असंही फडणवीस म्हणाले.
जलसंधारण परीक्षेत एक विद्यार्थी सापडला, ज्याच्यचा प्रवेशपत्रावर काही आकडे सापलडे होते. त्यामुळे आपण त्या परीक्षेचा पेपर फुटला असे समजून रद्द केली होती, असं फडणवीस म्हणाले. सरकारी यंत्रणा अपयशी ठरली नाही. मात्र, विरोधकांनी खोटं नॅरेटीव्ह पसरवलं. मात्र, तसं नाहीये, असं फडणवीस म्हणाले.