‘सगळं काही ठीक आहे’… पवारांशी चर्चेनंतर धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य

‘सगळं काही ठीक आहे’… पवारांशी चर्चेनंतर धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य

Dhananjay Munde Discussion with Ajit Pawar : राज्यातील राजकारणात अजित पवारांनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीत नाराज असलेला अजित पवार हे भाजपसोबत जाणार का ? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच अजित पवारांचे विश्वासू असलेले आमदार धनंजय मुंडे हे देखील नॉटरिचेबल होते. मात्र आज ते विधानभवनात आले. त्यांना अजित पवारांविषयी विचारले असता ते म्हणाले ‘सगळं काही ठीक आहे, परफेक्टली वेल’ असे सूचक विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे. यामुळे राजकारणात आता कोणता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे अस्वस्थ असल्याच्या चर्चा सध्या राज्यातील राजकारणात रंगत आहे. यातच अनेक आमदार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होऊ लागली आहे. याच दरम्यान अजित पवार यांचे खास अशी ओळख असलेले माजीमंत्री तसेच आमदार धनंजय मुंडे हे देखील काहीकाळ नॉट रिचेबल होते. यामुळे या चर्चा आणखीच रंगू लागल्या.

गेली दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले धनंजय मुंडे आज विधान भवनात दाखल झाले. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे देखील आज विधान भवनात दाखल झाले होते. मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली.

दरम्यान धनंजय मुंडे हे चर्चा करून विधान भवनातून बाहेर पडले आहेत. बाहेर पडताना धनंजय मुंडे यांना अजित पवार यांच्याविषयी विचारण्यात आले होते. यावर मुंडे यांनी, ‘सगळं काही ठीक आहे. परफेक्टली वेल’ असे सूचक विधान केले आहे.

दादांना आमदारांचा पाठिंबा
एकीकडे अजित पवारांची चर्चा होत असताना त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीतील आमदार पुढे येत आहेत. पिंपरीचे अण्णा बनसोडे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर यांनी उघडपणे दादांच्या निर्णयासोबत आम्ही जाऊ, असे म्हटले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube