धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा! म्हणाले, शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला

धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा! म्हणाले, शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला

Dhanjay Munde Criticizes On Sharad Pawar : ‘कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाही’ असं जीव तोडून सांगणारे धनंजय मुंडे आता शरद पवारांना खोट ठरवण्यासाठी जीवाचं रान करताना दिसंत आहेत. (Sharad Pawar) त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना घेरलं आहे. (Dhanjay Munde) भाजपसोबत जाण्याबद्दल (NCP BJP) शरद पवारांची काय भूमिका होती या विषयी धनंजय मुंडे सध्या वारंवार बोलत आहेत.

 

तर मला लाज वाटली असती… भरसभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंना टोला

शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याबाबत बैठका

धनंजय मुंडे म्हणाले, 2017 मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी दिल्लीत काय घडलं? गणपती बसले त्या दिवशी दिल्लीत सगळं काही ठरलं होतं. दरम्यान, या सगळ्या गोष्टींबाबत तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर माझी ‘ब्रेन मॅपिंग’ करा म्हणजे ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होईल असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसंच, दिल्लीत ज्या बैठका झाल्या त्या शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याबाबत झाल्या असा दावाही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला आहे.

 

तर आज जे झालं ते झालं नसत

यावेळी धनंजय मुंडे यांनी 2019 ला झालेल्या पहाटेच्या शपथ विधीबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, पहाटेचा जो शपथविधी झाला तो शरद पवारांच्या संमतीनेच झाला होता. हे मी दबाबदारीने सांगतोय असा मोठा दावा मुंडे यांनी केला आहे. याबाबत अनेक बैठका दिल्लीत झाल्या त्या समोर आल्या नाहीत असंही मुंडे म्हणाले आहेत. तसंच, 2019 ला अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा जाऊ दिले असते तर आज जे झाले ते झाले नसतं असं म्हणत याला कोण कारणीभूत आहे? असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

 

आम्ही पाठिंबा दिली ती गद्दारी

जो लोकांसाठी कष्ट करतोय त्याला खलनायक केलं जातंय असं म्हणत मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका करत अजित पवारांची स्तुती केली. त्याचवेळी भाजपपासून शिवसेना तुम्ही दूर केली ते योग्य आणि शिवसेनेपासून शिवसेना बाजूला झाली ती गद्दारी असा टोलाली मुंडे यांनी पवारांना लगावला आहे. तसंच, 2014 ला तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला ते संस्कार आणि आम्ही दिला तर ती गद्दारी असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

 

अजितदादांनाच 2024 मध्ये मुख्यमंत्री करायचं; युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं उद्दीष्ट ठरलं

अशी वाईट वेळ कुणावर येऊ नये

यावेळी सून बाहेरची या वक्तव्यावरूनही धनंजय मुंडे यांनी पवारांवर जोरदार घणाघात केला. ते म्हणाले, शरद पवार थुंकले तर ते  अजित पवारांनी कधी ओलांडलं नाही. आणि आज तुम्ही सुनेला परकं म्हणता. तुमच्या घरातही लेकीबाळी आहेत. एक निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात? असा थेट प्रश्न धनंजय मुंडेंनी यावेळी उपस्थित केला. तसंच, अशी वाईट वेळ कुणावर येऊ नये असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube