देवेंद्र फडणवीसांना ही अधोगती मान्य आहे का? धमकी प्रकरणावरुन राऊतांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांना ही अधोगती मान्य आहे का? धमकी प्रकरणावरुन राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On death threats : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधु आमदार सुनिल राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोघांनीही याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. यावरुन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Sanjay Raut’s criticism of Devendra Fadnavis over the threat case)

यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की मला धमकी आली यात काही विशेष वाटत नाही. पण शरद पवार यांना धमकी आली आणि ज्या पध्दतीने धमकी देण्यात आली आहे ही गंभीर बाब आहे. ‘तुमचा दाभोळकर करु’ ही ज्या प्रकारची भाषा आहे. ही भाषा कोण वापरत आणि कोणत्या पक्षाचे लोक आहेत हे उघड होईल. ‘शरद पवार हे औरंगजेब आहेत’ हा विचार कोणत्या पक्षाचे लोक मांडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी वक्तव्ये आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

Pravin Darekar : ‘शरद पवार सत्तेबाहेर असतात, तेव्हाच दंगली होतात; विरोधकच दंगलींना जबाबदार’

ते पुढं म्हणाले की कोणी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत आहे तर कोणी आमच्याविषयी बोलत आहेत. त्यांना बोलू द्या पण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची अधोगती मान्य आहे का? मला आलेली धमकी सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे मी घेणार नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले. अशा धमक्या येणं सरकारला हवं आहे. विरोधकांमध्ये दहशत निर्माण करणं, हे जर सरकारला हवं असेल तर आम्ही धमक्या स्विकारू, असे संजय राऊत म्हणाले.

Sharad Pawar यांना धमकी देणारा नक्की कोण? ट्विटरच्या बायोमध्ये धक्कादायक माहिती…

यापूर्वी ठाण्यातील एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने माझ्यावर हल्ल्याची योजना आखल्याचे गृहमंत्र्यांना सांगितले होते. पण त्यावेळी राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चेष्टा केली. आज त्याच गुंडाचे फोटो मुख्यमंत्री आणि त्यांच्या चिरंजीवासोबत झळकत आहेत. आता त्याच गुंडाला संरक्षण दिले आहे. ही राज्याची कायदा आणि सुव्यवस्था आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, ‘एका महिन्यांच्या आत सकाळचा भोंगा बंद केला नाही तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू’ अशी धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांना धमकी आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube