Maharashtra Politics : गुलाबराव पाटील म्हणतात, ‘होय, मी गद्दारी केली…

Maharashtra Politics : गुलाबराव पाटील म्हणतात, ‘होय, मी गद्दारी केली…

मुंबई : ‘पन्नास खोके.. एकदम ओके..’ ही घोषणा महाराष्ट्राच्या तळाघरात पोहोचली आहे. त्याबरोबरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना ४० आमदारांनी केलेल्या बंडखोराना गद्दार असे म्हणले जाते. उद्धव ठाकरे गट आजही या ४० आमदारांना गद्दार असेच संबोधतो. दरम्यान, या गद्दार आमदारांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर बंडात सहभागी असलेल्या आमदारांपैकी एक असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी चक्क आपल्या गद्दारी केली असल्याचा गौप्यस्फोट केला.

त्यांनी एकाजाहीर भाषणात स्पष्ट कबुली देत म्हटले आहे की, ‘होय, मी गद्दारी केली. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. आज, मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसतो यातच मतदारसंघाचा जयजयकार आहे,’ असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याची आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली. आजवर एकनाथ शिंदे गट नेहमी सांगत आला आहे की, आम्ही गद्दार नाही आहोत. आम्ही बंडखोर आहोत. आम्ही गद्दारी नव्हे तर उठाव केला. दरम्यान, खरी शिवसेना आम्हीच हा दावा देखील शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला. निवडणूक आयोगानेही मग हा दावा मान्य करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बहाल केली. यामुळे आगोदरच अनेक तर्कवितर्क सुरु असताना आता थेट गुलाबराव पाटील यांचा खुलासा आला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.

Arvind Kejriwal : पक्ष आणि नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच

नेमके काय म्हटले गुलाबराव पाटील?

‘होय, आम्ही गद्दारी केली. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी आम्ही गद्दारी केली. एकनाथ शिंदे मराठा आहे, त्यांच्यासाठी मी हा त्याग केला. गद्दारी केली. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो, ह्यातच मतदारसंघाचा जयजयकार आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube