काका-पुतण्यांचा ‘राजकीय मेल’? रोहित पवारांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत नव्या समीकरणांची चाहूल
Pawar family देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Indications for Pawar family coming together in local government elections after Rohit Pawar Statement : राज्यामध्ये लोकसभा, विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासूनच राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. त्यासाठी पक्षांमध्ये इनकमिंग असो , युती वा आघाड्यांच्या चर्चा असो तसेच यामध्ये आणखी काही चर्चा झाल्या त्या एकमेकांचे राजकीय शत्रू मानल्या जाणाऱ्या पक्षांच्या एकत्र येण्याच्या त्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची त्यानंतर आता दोन वर्षांपूर्वी विभागलेलं पवार कुटुंब देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
विजयानंतर पंतप्रधानांना भेटली महिला क्रिकेट टीम; हरमनप्रीतने सांगितला 2017 ‘तो’ किस्सा
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. दोन वर्षांपूर्वी वेगळ्या वाटा धरलेल्या पवार घराणं आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हालचाली सुरू असून, येत्या निवडणुकांत काही मोठी घोषणा होऊ शकते.अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
राज ठाकरेंसोबत ‘आघाडी’ ला नकार ; मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम?
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपल्या बालेकिल्ल्यांच्या राखण आणि विस्तारासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः पुणे-पिंपरी चिंचवड पट्ट्यातील राजकीय हालचालींमुळे पवार कुटुंबाकडे पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या चर्चांना अधिक हवा मिळाली ती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे. रोहित पवार यांनी संकेत दिले आहेत की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका-पुतणे एकत्र येतील.”
काय म्हणाले होते रोहित पवार?
अजित पवार यांनी आमचा पक्ष आणि शरद पवार यांना सोडलं त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. पण अजित पवारांवर नाराजी असण्यापेक्षा आमचा खरा राग हा भाजपवर आहे. कारण भाजपने आमचा पक्ष आणि परिवार तोडला आहे. त्यामुळे राग आणि नाराजी याच फरक आहे. नाराजी ही स्थानिक पातळीवर दूर होऊ शकते, पण राज गा दूर केला जाऊ शकत नाही.
घोटाळा केला नाही, पार्थ पवारांचा दावा; दादांच्या ‘पार्थ’ वर कारवाईचा ‘चाबूक’? फडणवीसांच्या मनात काय?
या विधानानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी पाऊल पुढे टाकले, तर अजित पवार गटही सत्तेतील ताकद वापरून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काका-पुतण्यांचा हा संभाव्य ‘राजकीय मेल’ महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणाला नव्या वळणावर नेईल, हे निश्चित
