MIDC साठी मंत्री असल्यापासूनच राम शिंदेंचे प्रयत्न; श्रेयवादाच्या लढाईत उदय सामंतांनी आणला नवा ट्विस्ट
Uday Samant On Rohit Pawar : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून कर्जत येथे एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी चांगलेच आक्रमक झाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ पावसात आंदोलन केले होते. यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या एमआयडीसीबद्दल मोठे विधान केले असून यामुळे रोहित पवारांना चांगलाच दणका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे या एमआयडीसीसाठी आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना राम शिंदे यात राजकारण करत असून मला श्रेय मिळू नये म्हणून हे काम करत असल्याचे म्हटले होते. त्यावर उदय सामंतांनी राम शिंदे यांनी मंत्री असतानाच मुख्यमंत्र्यांना एमआयडीसीसाठी पत्र लिहिले होते व त्यासंदर्भात ते पाठपुरावा करत होते, असे सामंतांनी म्हटले.
सामंत म्हणाले की, “माझ्यामागे विधानसभेचं भरगच्च कामकाज होतं. त्यामुळे कालच्या बैठकीला मला उपस्थित राहता आले नाही. पण उद्योग विभागाचे सर्व अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. मी अधिकारी यांच्या कडून कर्जत एमआयडीसीचा आढवा घेतला. मी अधिकारी यांच्या कडून कर्जत एमआयडीसीचा आढवा घेतला. राम शिंदे हे मंत्री असतानाच त्यांनी या एमआयडीसीसाठी पत्र दिले होते.”
दरम्यान, उदय सामंत यांनी असे वक्तव्य करुन रोहित पवारांच्या मागणीतील हवा काढून घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच याचे श्रेय राम शिंदेंनाही जाते असे सामतांनी निदर्शनास आणून दिले आहे. यावर आता रोहित पवार काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.