विजयदादा हे अस्सल सोनं, त्यांना कळलं नाही; जयंत पाटलांचा फडणवीसांना सणसणीत टोला

विजयदादा हे अस्सल सोनं, त्यांना कळलं नाही; जयंत पाटलांचा फडणवीसांना सणसणीत टोला

Jayant Patil : आज भाजपला (BJP) मोठा धक्का देत धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

विजयसिंह मोहिते पाटील ( Vijay Singh Mohite Patil) हे अस्सल सोनं आहे. मात्र त्यांना यांची किंमत कळली नाही म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला आहे.

गेल्या 10 वर्षापासून देशातील जनता ज्या प्रश्नापासून वंचित राहिली त्यांना न्याय देण्याचे काम इंडिया आघाडी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान बदलायचं आहे, त्यामुळे आज भाजप 400 पारची घोषणा देत आहे. आम्ही सत्तेत आलो तर कायदा बदलून आरक्षण देऊ असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिला. याचं बरोबर जातनिहाय जनगणना करणार असल्याचं ते म्हणाले.

2 मराठी माणसांचे पक्ष फोडले

गेल्या काही दिवसांपासून राज्यात होणाऱ्या राजकारणावरून देखील जयंत पाटील यांनी भाजपवर टिका केली आहे. भाजपने राज्यात 2 मराठी माणसांचे पक्ष फोडून राज्यातील राजकारणाची पातळी घसरवली असल्याची टीका त्यांनी केली.

आम्ही टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करत नाही, विजयदादा हे जुनं सोने आहे त्यांना यांची किंमत कळली नाही, खरं सोने ओळखण्यासाठी जातिवंत सोनार लागतो असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लावला. केंद्र सरकारने 25 लाख कोटी रूपयांची कर्ज माफी देशातील काही मूठभर लोकांना केली मात्र शेतकऱ्यांची कर्ज माफी का? होत नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोहिते पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आहवान कार्यकर्त्यांना केला.

पक्ष प्रवेशानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube