‘इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?’ ‘गोळीबारा’च्या घटनेवर वडेट्टीवारांचा संताप
Vijay Wadettiwar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. विरोधकांनीही या संधीचा पुरेपूर वापर करून घेत सत्ताधारी गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? असा सवाल त्यांनी विचारला आहे. वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर येथे पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही. भाजपावाल्यांचे बॉस सागर बंगल्यावर आणि शिंदे गटाचे बॉस वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षांतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे.
कल्याण : CM शिंदेंच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; भाजप आमदार गणपत गायकवाडांचे पोलिसांसमोरच कृत्य
गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात.. कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा महाराष्ट्र कधी नव्हता! अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.