‘राहुल गांधींची नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी अवस्था’;कंगना रणौतचा राहुल गांधींना टोला! नेमकं काय घडलं?

Kangana Ranaut on Rahul Gandhi; दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान कंगना रणौत यांनी राहुल गांधींवर टीका केली.

Kangana Ranaut on Rahul Gandhi

Kangana Ranaut on Rahul Gandhi: दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरु आहे. पोलिसांकडून अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) या आंदोलनाला पोहचण्यापुर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) राहुल गांधीवर (Rahul Gandhi) गंभीर टीका केली.

मोठी बातमी! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मुंबई पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

काय म्हणाली कंगना रणौत

राहुल गांधी यांना राष्ट्रपतींची भेट घेऊन तक्रार करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेवर टीका करताना कंगना रणौत यांनी शाळेतील नापास विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले. राहुल गांधींना राष्ट्रपतींना भेटण्याचा अधिकार आहे. पण आमच्या शाळेतही असंच घडायचं. जे विद्यार्थी परीक्षा नापास होतात, ते म्हणायचे की त्यांना वेगळी आणि कठीण प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, किंवा शिक्षकांचा त्यांच्यावर राग होता म्हणून त्यांना नापास केले. बायपोलपासून ते विद्यार्थी निवडणुकांपर्यंत सर्वत्र भाजप जिंकत आहे, म्हणूनच राहुल गांधींना त्रास होत आहे. आता कोल्ह्याला द्राक्षं आंबट वाटतायत आणि देश त्यांच्यावर हसतोय, अशी टीका कंगनाने राहुल गांधींवर केली.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंवर 509 सारखा गुन्हा; आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

त्याचबरोबर तिने म्हटलं की, राष्ट्रविरोधी घटक, दहशतवादी शक्ती आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थानं या काळात देशासाठी गंभीर चिंतेचा विषय बनले आहेत. देश आणि नागरिकांना एक किंवा दुसऱ्या निमित्ताने त्रास देण्यासाठी विविध कटकारस्थानं रचली जात आहेत. पोलिस तर सोडाच आता लोकंच यांची चांगली धुलाई करतील. शेवटी तिने सांगितलं की, प्रभू राम आणि बजरंग बली यांचे आशीर्वाद भारतासोबत आहेत.

हुकूमशाहीचा माज उतरवायला जनता तयार, आंदोलन चिरडण्यावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा

दरम्यान, जंतरमंतरवरील सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर कंगना रणौतने राहुल गांधींवर टीका केली आहे.

follow us