Ajit Pawar : कोश्यारींनी ‘ते’ पत्र पब्लिश करावं, दूध का दूध, पाणी का पाणी होईल
मुंबई : ‘माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे काही 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र आहे ते पब्लिश करावं. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मिडीयाला ही हे पत्र दाखवावं जेणे करून मिडीयाला कळेल की, खरं काय आहे ?’ असं प्रतिउत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरांशी बोलताना कोश्यारी यांना दिलं.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की,
उद्धव ठाकरेंचे शकुनीमामा कोण ? कोश्यारींनी सांगितलं…
कोश्यारी यांना यावेळी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पाठवलेल्या पत्राबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मला तत्कालीन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र पाठवले होता. पण त्या पत्रामध्ये राज्यापालांना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत मुदतीचे निर्देश देम्यात आले होते. त्याचबरोबर धमकीही देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट कोश्यारी यांनी यावेळी केला.
यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जे राजकारणी आहेत, नेते आहेत, चिंतक आहेत ते विचार करत असतील हे कसं काय झालं ? कधी-कधी अशा गोष्टी एका क्षणात घडतात तर एका रात्रीचं काय एका क्षणात भूकंप येऊ शकतो. पण हा पहाटेचा शपथविधी एका रात्रीत झालेला नाही.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेते माझ्याकडे आले. कागद पत्रांवर त्यांच्या सह्या आहेत.ते काही छोटे-मोठे नेते नाहीत. अजित पवार देखील एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. ते माझ्याकडे आले तर मी म्हणालो तुमच्याकडे बहुमत आहे तर सिद्ध करा. सिद्ध कारायला वेळ देखील दिला. पण त्यानंतर कोर्टाने हा वेळ कमी करायला सांगितला. तर हा वेळ कमी करण्यात आला. पण त्यांच्याकडे बहुमत नव्हत त्यांनी राजीनामाही दिला. हे सर्व सामान्य होतं.