नुसती विधानपरिषदेवर बोळवण करू नका, तर महसूल किंवा शिक्षण खाते द्या; हाकेंची मोठी मागणी
Laxman Hake : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) सुफडा साफ झाला. तर महायुतीचे (Mahayuti) 236 उमेदवार निवडून आले. लाडकी बहीण योजनेसह (Ladki Bahin Yojana) ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोष पाठिबा, यामुळं महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याचं बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी केली आहे.
शिंदेंची कडवी झुंज अपयशी; मात्र, पवारांना घाम फोडला…
माझी विधानपरिषदेवर बोळवण करू नये. तर, मला महुसल किंवा शिक्षण खाते द्यावे. कारण मी राज्यात 50 टक्के असणाऱ्या ओबीसींचे प्रतिनिधित्व करतो, असं हाके म्हणाले.
हाके म्हणाले की, मनोज जरांगेंनी आपले 205 उमेदवार कोठून निवडून आले हे सांगावे, खोटे बोलून दिशाभूल करू नये. मराठा समाजाचे 112 आमदार निवडून आले आहेत. ओबीसी नेत्यांना सर्व जातींचा पाठिंबा होता. सर्वांनी ओबीसी नेत्यांना सहकार्य केलं, असं हाके म्हणाले.
घनसांगवीमध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव झाल्याने आम्ही आनंदी आहोत. मी जिंतूर, अहमदपूर, माजलगाव, गेवराई, भूम, तुळजापूर, परतूर आदी मतदारसंघात सभा घेऊन उमेदवारांना चांगले मताधिक्य दिले. आघाडी सरकार जिंकले असते तर ओबीसीचा प्रश्न मार्गी लागले नसते, असं हाके म्हणाले.
विधानपरिषदेवर बोळवण करू नका..
पुढं ते म्हणाले की, आमच्या आंदोलनावर अनेक आरोप झाले पण आम्ही ठाम भूमिका घेतली. आघाडीतील नेत्यांनी ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. आम्हाला ज्यांना निवडणुकीत पाडायचे होते, त्यांना पाडले आहे. राज्यात सत्ता परिवर्तनाची आम्ही भाषा केली आणि ते करून दाखवले. त्यामुळं माझी विधानपरिषदेवर बोळवण करू नये. तर, मला कॅबिनेट महुसल किंवा शिक्षण खाते द्यावे. कारण मी राज्यात 50 टक्के असणाऱ्या ओबीसींचे प्रतिनिधित्व करतो, असं हाके म्हणाले.
नगर जिल्ह्यातून ‘या’ आमदारांची नावे मंत्रिपदासाठी…वाचा सविस्तर
ओबीसींचे प्रश्न मार्गी लावावे…
हाके म्हणाले की, राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असून ओबीसी समाजाने चांगले मतदान केले. आम्ही ओबीसी उमेदवार दिले त्या ठिकाणी महायुतीला मतदान करावे असं आवाहन केले होते, त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जो राज्याचा मुख्यमंत्री होईल त्यांना पंचायत राज निवडणुका कधी होणार याबाबत पुढाकार घ्यावा. ओबीसी समाजाच्या अनेक प्रश्न आहेत, ते मार्गी लावावे, अशी मागणी हाकेंनी केली.
मराठा नेते मनोज जरांगे एक बावळट माणूस उठतो आणि रोज वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका बदलतो आणि राज्यात जातीय तेढ निर्माण करतो. जरांगे राज्यातील 130 मतदारसंघात पाडापाडी करण्याचे सांगत होते. पण, त्यांनी ज्या ठिकाणी मेसेज दिला, त्याठिकाणी विरोधी उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले. जनतेने त्यांचे थोबाड फोडले आहे. ज्यांचा पराभव करण्यासाठी ते निघाले ते विजयी झाले. छगन भुजबळ यांचा पराभव करण्यासाठी गेलेले जरांगे तोंडघशी पडले, अशी टीकाही हाकेंनी केली.