विधान परिषद निवडणूक मविआसाठी आव्हान! ठाकरे, गोऱ्हे कुणाचे कोणते सदस्य निवृत्त होणार

Legislative Council elections एप्रिल महिन्यात जाहिर होणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडीसमोर (एमव्हीए) ही निवडणूक मोठे आव्हान ठरणार आहे,

Udhav Thakre. 2

Legislative Council elections challenge for MVA Which of members will retire With Thackeray, Gorhe : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहातून तब्बल नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. या नऊ सदस्यांची मुदत 13 मे 2026 रोजी संपत असल्याने हे त्यांचे अखेरचे अधिवेशन ठरणार आहे.

गॅस पुरवठ्यावर संकट! आता 14.2 किलो ऐवजी 10 किंवा 7 किलो सिलेंडर मिळणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या आणि अखेरच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत असून, केवळ तीन दिवसांचे कामकाज असणार आहे. त्यामुळे या सदस्यांना आज दुपारी निरोप दिला जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक चार जण आहेत – रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे या शिवाय उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शप), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि राजेश राठोड यांचीही मुदत संपत आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राडा विधान परिषदेत गाजला; पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाचे आदेश

सदर निवृत्तीमुळे विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार असून, एप्रिल महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर होणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडीसमोर (एमव्हीए) ही निवडणूक मोठे आव्हान ठरणार आहे, कारण विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा निवडीसाठी संजय राऊत यांसारख्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असले तरी, एमव्हीएतील मते एकत्रित राखणे आणि छोट्या पक्षांची साथ मिळवणे आवश्यक ठरणार आहे.

ज्योतिबा मंदिरात गोंधळ; 15-20 पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांकडून चर्चेची मागणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचे कारण देत ही चर्चा चार आठवडे टाळली गेली. आता अखेरच्या आठवड्यात तरी विशेष चर्चा घडवून आणली जाईल की, फक्त उत्तर देऊन विषय संपवला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करून या मुद्द्यावर दबाव आणला आहे.

नाशिक ‘भोंदूबाबा’ प्रकरणी विरोधक सरकारला घेरणार

नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, जमीन हडपणे, बेपत्ता प्रकरणे असे गंभीर आरोप असून, ५८ हून अधिक अश्लील व्हिडीओ पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा दावा करत मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. विरोधक हे प्रकरण अधिवेशनात उचलून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे सत्ताधारी महायुतीला अस्वस्थता येऊ शकते. या सर्व घडामोडींमुळे चालू अधिवेशनाचे शेवटचे आठवडा राजकीयदृष्ट्या तापमान वाढवणारे ठरणार हे निश्चित.

follow us