कॉंग्रेस पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतंय , ते राम मंदिरालाही कुलूप…; अमित शाहांचा मोठा दावा
Amit Shah On India Alliance : विरोधी पक्षांकडे कोणताही अजेंडा नाही. ते पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेत आहेत. भविष्यात जर कॉंग्रेस (Congress)सत्तेत आली तर ते राम मंदिराला कुलूप लावतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला.
दानवेंना निवडून द्या, मराठवाडा दुष्काळमुक्त करू -फडणवीस
जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचाचार्थ आज अमित शाह यांची जालन्यात सभा झाली. त्यावेळी बोलतांना शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला समृद्ध आणि संपन्न केलं. नरेंद्र मोदींनी देशाचे नाव जगभरात उंचावण्याचे काम केले आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे काम नरेंद्र मोदींनीचं केलं. तर शरद पवार अँड कंपनीने राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षे प्रलंबित ठेवल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.
कोविडमध्ये ठाकरेंचे सहकारी खिचडी घोटाळा करुन मलाई खात होते…; अमित शाहांचा हल्लाबोल
पुढं बोलतांना शाह म्हणाले, मोदींनी केवळ पाच वर्षांत राम मंदिर मंदिराचा खटला जिंकलाच नाही तर मंदिराचे भूमिपूजन करून मंदिर उभारलं आणि आता प्राणप्रतिष्ठा देखील केली. एवढेच नाही तर प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण इंडिया आघाडीच्या नेत्यांना देण्यात आलं होतं. मात्र, इंडिया आघाीच्या नेत्यांनी कारणं सांगून या कार्यक्रमाला जाण्याचे टाळलं. त्यांना प्राणप्रतिष्ठेपेक्षाही त्यांची व्होट बॅंक महत्वाची वाटत होती, अशी टीका शाह यांनी केली.
मोदींकडे दहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आहे आणि पुढील पंचवीस वर्षांचा अजेंडाही आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ. इंडिया आघाडीकडे मात्र, कोणताही अजेंडा, ठोस कार्यक्रम नसल्याची टीका शाह यांनी केली.
मोदींनी मात्र, ८० करोड गरिबांच्या घरी राशन पाठवलं. मोदींनी कोरोना काळात 130 कोटी नागरिकांना मोफत लस देऊन सुरक्षित केलं. त्या काळात उद्धव ठाकरेंचे सकारी खिचडी घोटाळा करून मलाई खात होते, अशा शब्दात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचाही समाचार घेतला.
देशामध्ये उष्णता वाढताच राहुल गांधी बँकॉक थायलंडला जातात. तर दुसरीकडे गेल्या २३ वर्षापासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करताना एक दिवसही नरेंद्र मोदींनी सुट्टी घेतली नाही. त्यामुळे आता कोणाला निवडून द्यायचे हे जनतेनेच ठरवायचे आहे, असं आवाहन शाह यांनी केलं.