विरोधक धांदात खोटं बोलताहेत; ‘महानंद’च्या आरोपांवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण

विरोधक धांदात खोटं बोलताहेत; ‘महानंद’च्या आरोपांवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण

Ajit Pawar On Mahanand Dairy : महानंद डेअरीवरुन केलेले आरोप बिनबुडाचे असून विरोधक धांदात खोटं बोलतात, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महानंद प्रकल्पावरुन विरोधकांकडून केले जात असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा मंगळवारपासून थरार !

अजित पवार म्हणाले, जळगाव सहकारी संस्थादेखील एनडीडीबीला दिली होती. महानंद डेअरीवरुन विरोधकांकडून अनेक आरोप केले जात आहेत. मात्र, विरोधक धांदात हे खोटं बोलत असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप घर आणि पक्ष फोडतेच, पण आता विद्यार्थ्यांचे पेपरही फोडतेय; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

काही दिवसांपासून महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून खळबळजनक माहिती दिली. महानंद गुजरातला विकल्याचा दावा त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे. दरम्यान, महानंदचे चेअरमन राजेश पजरणे यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिला. त्यामुळे आता महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्य सहकारी दूध व्यवस्थाकीय संचालकांकडे परजणे यांचा राजीनामा पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

‘मुद्दामहून रात्री ट्विट करत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आह, असं म्हणाल! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय! जय हो, महानंद की!’ असे खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी महानंद डेअरीवरुन होत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube