मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणेवर आणि जाहिरातबाजीवर जास्त खर्च होत आहे यामुळे महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या अधोगती व्हायला लागली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत पाहणी अहवालाची चिरफाड केली. 21-22 ला महाविकास आघाडी […]
मुंबई : पूर्वोत्तर भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील नागालँड राज्य सध्या राजकीय घडामोडीमुळे चर्चेत आहे. कारण या राज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने राजकीय धुरळा उडाला आहे. त्यामुळे यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच खुलासा केला आहे. […]
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरा कोणी हुकमी एक्का नसल्याने ते ठाकरे यांच्यावर बोलत असल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे यांना लगावला आहे. Ajit Pawar यांनी बैठक घेतली आणि विखेंनी दाखवला इंगा! अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपले प्रश्न मांडण्यासाठी आमदार जाधव विधीमंडळात आले होते. यावेळी त्यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी […]
नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील सर्व संचालकांना विश्वासात न घेता सहकारमध्ये राजकीय रंग देण्याचा विराेधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी नाईलाजाने निवडणूक लढवावी लागली. विराेधी पक्षनेत्यांनी भाजप (BJP) संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विराेधकांना जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवला आहे, असा टाेला खासदार डाॅ. सुजय विखे-पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी लगावला. तर दुसरीकडे राज्याचे […]
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक झाली. त्यात भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना चीतपट केलं. ही तर विखेंचीच किमया, असं नूतन जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी सांगून विराेधकांवर चांगलाच हल्लाबाेल केला. नवीन पान सुपारी सम्राट कोण? हे महाराष्ट्राने ओळखावं, गजानन काळेंचा पवारांना टोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक […]
मुंबई : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला सरकारच बनवण्यासाठी पाठिंबा दिला म्हणे, पवार साहेब हे तो मुमकिन है. आता भारतीय जनता पक्षाची ध,ब,क,ड टीम ही राष्ट्रवादी पक्षाला म्हणावं का ? पहाटेच्या शपथ विधीला पवार साहेबांचा पाठिंबा होता. हे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर शिक्कामोर्तब झाला आहे का ? महाराष्ट्रातला एक खूप मोठा नेता म्हणाला, आदरणीय […]