बहुमत न मिळाल्यास भाजप सरकार कसं स्थापन करणार? महायुतीचा ‘प्लॅन बी’ तयार
Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या सर्व अंदाजात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
भाजपचा अंतर्गत सर्व्हे देखील समोर आला होता. या सर्व्हेमध्ये भाजपचा 164 जागा मिळवण्याची शक्यता वर्तवली जातेय. परंतु जर उद्या निकालात धक्कादायक कल समोर आला. महायुतीला बहुमत मिळालं (Maharashtra Assembly Election 2024 Result) नाही, तर राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचा प्लॅन बी काय असेल? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. परंतु या अनुषंगाने भाजपने विशेष रणनीती आखण्यास सुरूवात केलीय. महायुतीला बहुमतासाठी 145 जागा मिळाल्या नाही, तर सरकार स्थापन करण्यासाठी प्लॅन बी महायुतीने तयार केलाय.
मोठी बातमी! निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येणार; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी अपक्ष उमेदवारांसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलंय. महायुती कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे. महायुतीकडून आता प्लॅन बी अॅक्टीव्ह करण्यात आलाय. अपक्ष आणि छोटे पक्ष यांना सोबत घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे. बहुमतासह आपली सत्ता येणार, असा विश्वास महायुतीतील मित्रपक्षांकडून व्यक्त करण्यात येतोय. पाठिंबा देणाऱ्या पक्षांना सरकारमध्ये सामावून घेतलं जाणार आहे.
पहिल्याच डावात टीम इंडियाचा खेळ 150 धावांत आटोपला, ऑस्ट्रेलियाचेही 4 गडी बाद
सद्यस्थितीत महाविकास आघाडी सोबत नसलेल्या स्वबळावर निवडणूक लढवलेल्या छोट्या पक्षांना सोबत घेण्यावर महायुती भर देत आहे. या पक्षांमध्ये बहुजन विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रहार जनशक्ती पार्टी या पक्षांचा समावेश आहे. महायुतीचे नेते या पक्षांच्या संपर्कात असल्याची देखील माहिती मिळतेय. तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या अंदाजांना डावलून महाविकास आघाडी विजयाचा दावा करत आहे. महाविकास आघाडीने देखील बंडखोर अपक्ष अन् छोट्या पक्षांशी संपर्क साधायला सुरूवात केलीय.
उद्या निकालानंतर नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार, हे स्पष्ट होईल. उद्या सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीचे निकाल समोर येणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.