मोठी बातमी! निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येणार; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Narayan Rane : विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. परंतु, राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीची सत्ता येईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शरद पवार हे निकालानंतर मविआची साथ सोडून महायुतीसोबत हातमिळवणी करु शकतात, असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. (Narayan Rane) शरद पवार कुठल्याही क्षणी त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ शकतात, असं मला वाटतं, असं वक्तव्य नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. शरद पवार महायुतीसोबत हातमिळवणी करु शकतात. त्यामुळे राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार नाही आणि उद्धव ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असंही राणे म्हणाले आहेत.
नाना म्हणतात मी मुख्यमंत्री होणार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, मविआ चा ताबा शरद पवारांकडे
नारायण राणे यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी खरोखरच महायुतीसोबत हातमिळवणी केल्यास ती महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणारी घटना ठरेल. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणं कठीण होईल. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आता शिवसेनेचं पूर्वीसारखं वर्चस्व राहिलेलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
महायुतीमध्ये तिन्ही पक्षांची सध्या सार्वजनिकरित्या कोणतीही बोलणी सुरु नाहीत. मात्र, शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. अपक्षांशी आणि छोट्या पक्षांशी बोलणी करुन सर्व गणितं जमवायची आहेत. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारी निकाल स्पष्ट झाल्यानंतर महायुती अपक्ष आणि बंडखोरांशी बोलणी सुरु करेल. त्यादृष्टीने सागर बंगल्यावरील आजची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.