शिंदे सरकारचं वाढणार टेन्शन, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आजच करणार मूक आंदोलन
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapati Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली आहे. राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे. यातच काल लातूर येथे आयोजित एका सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) या घटनेबद्दल राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागितली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी 11 ते दुपारी 12 यावेळेत ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकार अलर्ट! नवा पुतळा उभारणीसाठी समिती नियुक्त; CM शिंदेंचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी जनसन्मान यात्रा काढली जात आहे. ही यात्रा काल लातूर शहरात (Latur) होती. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत अजित पवार बोलत होते. या घटनेत कठोर कारवाई केली जाईल. अधिकारी असोत किंवा कंत्राटदार दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच मी राज्यातील तेरा कोटी जनतेची माफी मागतो. . छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासारखेच आहेत. त्यांचा पुतळा वर्षभराच्या आत कोसळणं धक्कादायक आहे, असे अजित पवार म्हणाले होते.
नव्या पुतळ्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री महत्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. पुतळा कोसळण्यामागे काय कारणे आहेत आणि या घटनेसंदर्भात कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, आयआयटी, स्थापत्य अभियंते, राज्यातील नामांकित शिल्पकार आणि नौदलाचे अधिकारी यांची एक तांत्रिक समितीही स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
Chhava: छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और.. विकीच्या ‘छावा’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित