गुण जुळले की वेळ पुन्हा येईल; शिंदेच्या मंत्र्याचं सूचक विधान

  • Written By: Published:
गुण जुळले की वेळ पुन्हा येईल; शिंदेच्या मंत्र्याचं सूचक विधान

Gulabrao Patil On Maharashtra Political Rumors :  विरोधी पक्ष नेते अजित पवार नाराज नसल्याचे काल माध्यमांसमोर येत सांगितले असले तरी, अजूनही यावरील चर्चा काही केल्या थंडावताना दिसून येत नाहीये. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणा असे अजितदादांनी काल स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे आतल्या गोटात कुठे तरी पाणी मुरत असल्याचे अधोरेखित होत आहे. गुण जुळले की वेळ पुन्हा येईल असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एकदिवस आधी काहीशा थंडावलेल्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

पाटील म्हणाले की, अजितदादा पक्षांतर करणार असे संकेतही त्यांनी दिले आहेत. अजून तिथी आणि गुण जुळत नाहीये. त्यामुळे आता कोणती पुजा करावी लागले याबाबत एखाद्या ब्राम्ह्रणाला विचारावं लागेल. वेळ नक्की येईल असे म्हणत तसं झाल्यानंतर तुम्हीच माझी मुलाखत घ्यायला याल असे म्हणत वरचा ब्राह्मण कठोर असल्याचे म्हटले आहे.

अजित पवारांचं स्पष्टीकरण काय?

दरम्यान, काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चांना स्वतः अजित पवार यांनीच काल माध्यमांसमोर येत पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. ज्या बातम्या दाखविल्या जात आहेत, त्यात काहीच तथ्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण…

राऊतांवर हल्लाबोल

यावेळी बोलताना अजित पवारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह इतर पक्षांच्या प्रवक्त्यांवर निशाणा साधला. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. दरम्यान आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ते, नेते मजबूत असल्याचंही त्यांनी राऊतांना उद्देशून कडक शब्दांत हल्लाबोल केला.

Dhananjay Mahadik : नैतिकता गमावलेल्यांना कोल्हापूर स्विकारणार नाही, महाडिकांचं सतेज पाटलांवर टिकास्त्र

इतर पक्षाकडून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून नक्कीच सुरू आहे. मात्र आमदार फुटले तरी पक्ष फुटणार नाही. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांच्या नावाशी बांधलेला आहे. जसं शिवसेनेतून आमदार फुटले, मात्र पक्ष जागेवरच राहिला आहे. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या सर्व खोट्या आहेत.अजित पवार हे कुठेही जाणार नसल्याचं संजय राऊतांनी सकाळीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं. त्यावरुन अजित पवारांनी त्यांना झापलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube