ठाकरे गटाला आणखी एक धक्का ! माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (43)

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) हे लवकरच शिंदे गटामध्ये (Shinde Faction) प्रवेश करणार आहेत. दीपक सावंत हे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. खरेतर त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठी भगदाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश करत असल्याची घोषणा करत मोठा धक्का दिला होता. दीपक सावंत यांच्या निमित्ताने शिंदे गटाने परत एकदा ठाकरे गटाला धक्का दिला. दीपक सावंत हे शिंदे गटाचं मुख्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनामध्ये दाखल झाले आहेत. काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे येणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग

दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत होती. या नाराजीने उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात अंतर निर्माण झाल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान दीपक सावंत यांच्या शिंदे गटात प्रवेशामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube