अजितदादांची घालमेल अन् विखेंचा डायलॉग! म्हणाले, ‘जो होता है अच्छे के लिए होता है’
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील त्यांची जी चलबिचल सध्या सुरू आहे ही काही राजकारणी मंडळींच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे अजित पवारांबाबत काही प्रश्न आला की लागलीच त्यावर प्रतिक्रिया येतात. यामध्ये भाजप नेते जास्तच आघाडीवर आहेत. वारंवार हा मुद्दा उकरून अजितदादांच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत आहेत.
आताही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी या प्रकारावर अतिशय मिश्कील शब्दांत उत्तर दिले आहे. अजित पवार यांची राज्याच्या राजकारणात सध्या चलबिचल सुरू आहे असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला होता. त्यावर विखे यांनी हिंदी भाषेचा वापर करत कोपरखळी मारली. त्यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांत चांगलाच हशा पिकला.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
विखे म्हणाले, राज्याला पुलोदपासून मोठा इतिहास आहे. त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन झालं . तेच 1999 साली झालं. आता तरी वेगळी स्थिती काय आहे. विश्वासघाताच्या राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला कुणी दिली ?, दुर्दैवाने त्या सगळ्या प्रक्रियेत शिवसेना त्याला बळी पडली. आणि आज त्याच शिवसेनेचं अस्तित्व पूर्णपणे संपत आलं आहे. हे आता लोक सुद्धा अनुभवत आहेत. मला वाटतं हे राज्याच्या राजकारणाला कधीच मान्य नव्हतं, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावर टीका केली.
जो होता है,अच्छे के लिए होता है
यानंतर पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर विखे म्हणाले, अजित पवार यांच्या मनाची काय स्थिती आहे हे मला माहिती नाही. मी काही त्यांच्याशी कधी बोललो नाही. शेवटी मला वाटतं की जो होता है अच्छे के लिए होता है, अशा सूचक शब्दांत त्यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा