Cabinate Expansion: मंत्रिपद मिळालं, पण खातं काही मिळेना!, घोडं नेमकं कुठं अडलंय?

  • Written By: Published:
Cabinate Expansion: मंत्रिपद मिळालं, पण खातं काही मिळेना!, घोडं नेमकं कुठं अडलंय?

Maharashtra Politics : महायुती (Mahayuti) सरकारचा 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झाला. आता मंत्रिमंडळ विस्ता होऊन पाच दिवस उलटले तरी अद्यापही सर्वच मंत्री बिनखात्याचे दिसतात. खातेवाटप होत नसल्याने मंत्र्यांचे कामकाज ठरत नाहीये. त्यामुळं नेमके खातेवाटप तरी कधी होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं.

जबरदस्त! अवघ्या 1 लाखात घरी आणा Maruti Baleno CNG, जाणून घ्या तपशील 

अधिवेशन संपल्यानंतरच खातेवाटप?
15 डिसेंबरला महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर दोन दिवसांत खाते वाटप होईल, असे सांगण्यात येतं होतं. मात्र, अद्याप खातेवाटप झालं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये खातेवाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच गेल्या पाच दिवसांपासून खातेवाटप रखडलं आहे. महायुतीमधील तीन पक्षातील चूरस पाहता अधिवेशन संपल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळ खात्यांचे वाटप होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खातेवाटप का रखडले?
कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे दिली जाणार यावरून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यानंतर महायुतीचा मंत्रिपदांबाबत फॉर्म्युला ठरला आणि शपथविधी झाला. आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चांगली खाती मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळं खातेवाटप रखडलं. एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपदाची मागणी केलीये. मात्र, भाजपला गृहखात्यासोबत अनेक महत्वाची खाती हवीत. खातेवाटपावर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने खातेवाटप रखडल्याचं बोलल्या जातंय.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचे खातेवाटप अंतिम होण्यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बैठक घेणार घेऊन खातेवाटपाबाबत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

संभाव्य खातेवाटप कसे असेल?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला नगरविकास आणि गृहनिर्माण, तर राष्ट्रवादीला अर्थ, महिला व बालविकास आणि उत्पादन शुल्क ही खाते मिळू शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube