आम्हाला तोंड उघडायला लावू नका; ब्लॅकमेल प्रकरणात राऊतांचा फडणवीसांना इशारा
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विधिमंडळात फडणवीस यांनी या घटनेची माहिती दिली त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी या प्रकरणावर राज्य सरकारला इशारा दिला आहे.
राऊत म्हणाले, राज्यात खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. तेच खरे सूत्रधार आहेत. म्हणून आम्ही त्यांनाच प्रश्न विचारणार. ब्लॅकमेल प्रकरणात ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेने जे व्हिडीओ पाठवले होते त्यात आधीच्या सरकारमधील बड्या नेत्यांची संभाषणे आहेत. प्रकरण गंभीर असल्याने मला त्यात राजकारण करायचे नाही, असे फडणवीस काल म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अत्यंत महत्वाची बातमी…
हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. भाजपला कुटुंबात घुसण्याची सवय आहे पण, कुटुंबापर्यंत आम्ही जात नाही. हे प्रकरण पोलिसांत आहे त्यावर जास्त बोलणे योग्य होणार नाही. पण, ब्लॅकमेलिंगचा प्रकार थेट गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत गेला असेल तर गंभीर आहे. या प्रकरणात महाविकास आघाडीचा काहीच संबंध नाही. आम्हालाही तपास करता येऊ शकतो, तेव्हा मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा राऊत यांनी दिला.
पोलिसांनी या घटनेचा तपास करावा. राज्यात कोणत्याही महिलेच्या बाबतीत असे प्रकार घडू नयेत. ज्या अर्थी अशा घटना घडतात त्या अर्थी कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी
हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. कुटुंबापर्यंत आम्ही जात नाही. हे प्रकरण पोलिसांत आहे त्यावर जास्त बोलणे योग्य होणार नाही. पण, ब्लॅकमेलिंगचा प्रकार थेट गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत गेला असेल तर गंभीर आहे. या प्रकरणात महाविकास आघाडीचा काहीच संबंध नाही. आम्हालाही तपास करता येऊ शकतो, तेव्हा मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा राऊत यांनी दिला.
गुन्हेगारांचा बचाव करावा लागतो. हे देवेंद्रकडून अपेक्षित नाही. आम्ही देवेंद्र यांचा आधीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पाहिला आहे. मात्र त्यावेळचे देवेंद्र आता दिसत नाही. ही त्यांची मजबुरी आहे म्हणूनच आम्ही म्हणतो की काय होतास तु काय झालास तू, असा उपरोधिक सवाल राऊत यांनी केला.
फडणवीसांकडून राहुल कुल यांचा बचाव
राज्यात रोज कायदा सुव्यवस्थेचा मुडदा पडतोय पण ते काहीच करू शकत नाहीत. भाजप आमदार राहुल कुल यांचे 500 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंगचे प्रकरण मी फडणवीस यांच्याकडे दिले आहे. या प्रकरणी चौकशी करण्याऐवजी आमदार राहुल कुल यांना वाचविण्याचा फडणवीस प्रयत्न करत असल्याचाही आरोप राऊत यांनी यावेळी केला.