बहिणीचा सगळा भार माझ्या खांद्यावर घेतलाय; धनंजय मुंडेंचा थेट प्रीतमताईंना शब्द

  • Written By: Published:
बहिणीचा सगळा भार माझ्या खांद्यावर घेतलाय; धनंजय मुंडेंचा थेट प्रीतमताईंना शब्द

Loksabha Election 2024 : बीड: आज राज्यभर महायुतीचे मेळावे झाले. या मेळाव्यात थेट लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व इतर पक्ष यांचा महायुतीचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यात अनेकांनी लोकसभेला केवळ भाजपच्या उमेदवार खासदार प्रीतम मुंडेच (Pritam Munde) असतील, असे भाषणात सांगितले. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केलीय. लोकसभा निवडणुकीचा बहिणीचा सगळा भार माझ्या खांदावर घेतलाय, असा शब्दच भाऊ धनंजय मुंडे यांनी बहिण प्रीतमताईला दिला आहे. बीडचा विकास सध्याचे खासदार व माजी लोकप्रतिनिधी यांनी केलाय, असे सांगत पंकजा मुंडे यांचेही कौतुक धनंजय मुंडे यांनी केले.

महायुतीच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटो वगळला; प्रीतमताई कडाडल्या, ‘मुंडे साहेबांचा फोटो वगळून…’

धनंजय मुंडे म्हणाले, महायुतीचा उमेदवार एकच आहे. आपल्या खासदारांना तिसऱ्यांदा विजयी करायचे आहे. आज विरोधात उमेदवार कोणी नाही. आपल्यासमोर दिसत नाही. आपण सगळे एकत्र आले आहे. याचा अर्थ आपण निवडणूक जिंकले असे समजू नका. सगळेच सोपे आहे, असे समजू नका आहे. एकत्र आल्यानंतर निकाल अभूतपूर्व असणार आहे. सर्वाधिक मतांनी खासदार निवडून आणून ब्रेकिंग न्यूज करायची आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये लोकसभेत गेल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकारणार आहे. बहिणीचा मंत्रिपदही मिळू दे, असेही मुंडे म्हणाले. आपण ठरविले तर खाली काहीच राहणार आहे. हे प्रत्येक बूथवर मतांनी द्या, असे आवाहन मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांनी केले.

काँग्रेस का सोडली? शिवसेनेत प्रवेश करताच मिलिंद देवरांची पत्रातून जाहीर भूमिका

बहिणीला कानपिचक्याही
महायुतीच्या बॅनरवरती गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता. त्यावरून खासदार प्रीतम मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महायुती अभेद्य आहे. मुंडेसाहेबांचा फोटो बॅनरवर असला काय आणि नसला काय ? ते व्यक्ती मनात असली पाहिजे. त्यांनी उभे केलेले काम करणे गरजेचे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. कृपा करून विधानसभा होईपर्यंत गोडगोड बोला. लोकसभा झाल्यावर विसरून जाऊ नका, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube