अजितदादांचं बंड अन् फडणवीसांच्या सूचना; मावळच्या उमेदवाराची जय्यत तयारी

अजितदादांचं बंड अन् फडणवीसांच्या सूचना; मावळच्या उमेदवाराची जय्यत तयारी

Shrirang Barane On Maval Loksabha :  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या अनेक आमदार व खासदार यांचे 2024 साली काय होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच मावळचे शिवसेनेच खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वस्व असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मावळमधून कामाला लागल्याच्या सूचना दिल्या आहे, असे बारणे म्हणाले.

श्रीरंग बारणे यांनी 2019 साली राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पार्थ पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र आहे. त्यावेळी मावळमध्ये पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. पण आता पुन्हा पार्थ पवार हे सक्रीय झाले असून मावळमधून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बारणे यांनी मावळ मधून  आपणच उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे.

Maharashtra Politics शक्यता : शिंदेंचा राजीनामा, अजितदादा मुख्यमंत्री, पंकजा काँग्रेसमध्ये अन् बरंच काही…

बारणे म्हणाले की, परिस्थिती कितीही बदलली, घटनाक्रम कितीही बदलला तरीही मावळ मधील लोकसभेचा उमेदवार बदलणार नाही. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वस्व असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मावळमधून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहे.

NCP : मी राष्ट्रीय अध्यक्ष, शरद पवारांना बैठक घेण्याचा अधिकारच नाही : अजितदादा आता पूर्णपणे भिडले

दरम्यान, पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार का किंव बारणे हेच मावळचे उमेदवार राहणार का ते पाहणे महत्वाचे राहणार आहे. त्यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी विरोध केला होता. पण पार्थ यांना तिकीट देणे त्यांना भाग पडले होते. पण अजित पवार यांचा गट महायुतीत सामील झाल्याने शिंदे गटाची अडचण होणार एवढे मात्र नक्की.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube