‘आधीच मर्कट अन् त्यात मद्य प्यायलेला’; भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा प्रहार

‘आधीच मर्कट अन् त्यात मद्य प्यायलेला’; भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा प्रहार

Chagan Bhujbal On Manoj Jarange : आमची लायकी काढणारा तू कोण? आधीच मर्कत अन् त्यात मद्य प्यायलेला, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर प्रहार केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या वादंग पेटलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेऊन छगन भुजबळांसर सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी निर्धार मेळाव्यातून छगन भुजबळ पलटवार करताना दिसून येत आहेत. ठाण्यात आज ओबीसी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी छगन भुजबळ जरांगे यांच्यावर बरसले आहेत.

‘जरांगेंनी महाजनांची रेकॉर्डिंग व्हायरल केली पाहिजे’; एकनाथ खडसेंकडून मिठाचा खडा

छगन भुजबळ म्हणाले, जरांगे आमची लायकी काढतो काहीही बोलतो. आमची लायकी काढणार तू कोण? आधीच मर्कत अन् त्यात मद्य प्यायलेला म्हणजे आधीच माकड अन् त्याच्यात बेवडा पेला. आमची लायकी काय पाहतोस.शिवरायांच नाव घेऊन आमच्यावर हल्ले करायचे. शिवराय जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाहीतर मावळे घेऊन लढले असा लिहिला जातो ते मावळे आम्ही आहोत,आमची लायकी काढणारा तू कोण? या शब्दांत छगन भुजबळांनी जरांगेंचा समाचार घेतला आहे.

‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअ‍ॅक्शन

तसेच मी माझ्या कुटुंबियांनीकधीच आरक्षण घेतलेलं नाही. गोरगरीब, अर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आज कुठंतरी आरक्षण मिळतंय तर त्यात वाटेकरी आले आहेत. आरक्षणात वाटेकरी येत असल्याने सभा घ्याव्या लागतात. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आमचा विरोध झुंडशाहीला, दादागिरीला, जाळपोळ करणाऱ्यांना आहे
आमदारांची घरे जाळली त्यांना विरोध. आरक्षण म्हणजे गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. दलित समाजाला आरक्षण मिळालं पण आजही झोपडपट्टीतच ते आहेत
त्यामुळे हा गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

मराठा समाजाला आमचा विरोध नाही. ओबीसीत 374 जाती आहेत. अगोदरचे कुणबी मान्य आहेत. आता कुणबी म्हणून माजी न्यायमूर्ती शिंदे समितीत सगळीकडे फिरत आहे. दणादण खोटे दाखले दिले जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. मराठा समाजही गरीब आहे. ओबीसी विद्यार्थांना अर्धी फी तर मराठा समाजाला अर्धीच फी आहे. ईडब्लूएसच्या आरक्षणात 85 टक्के मराठा समाजाचे लोकं आहेत. लोकसेवा आयोगात नियुक्त्या 95 टक्के मराठा समाजाच्या असून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता अनेक कोटी रुपये देण्यात आले आहेत. पण ओबीसी महामंडळांना आत्तापर्यंत एक कोटीही मिळाले नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube