आमश्या पाडवींच्या अडचणीत वाढ, भाजप महिला कार्यकर्तीने केला विनयभंगाचा आरोप

  • Written By: Published:
आमश्या पाडवींच्या अडचणीत वाढ, भाजप महिला कार्यकर्तीने केला विनयभंगाचा आरोप

Amshya Padvi : शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी (Amshya Padvi) यांच्या अडचणीत वाढ झाली. पाडवी यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये (Akkalkuwa Police Station) त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण करत करण्यात आला, असा आरोप तक्रारदार महिलेनं केला.

पाकिस्तान घाबरला, चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवरच, जाणून घ्या बैठकीत ठरलं तरी काय?  

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही भाजप कार्यकर्ती आहे. तर महिलेचा भाऊ भाजप पंचायत समिती सदस्य आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून कुटुंबातील सदस्य आणि महिलेला मारहाण करण्यात आली. मारहाण करून विनयभंग करण्यात आला, अशी तक्रार महिलेनं दाखल केली. याप्रकरणी आमदार पाडवी यांचे पुत्र जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी यांच्यासह कार्यकर्त्यांवर अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलानेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी, भाजप तालुकाध्यक्ष नितेश वळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

‘यांच्या खेळात राज्याचा खोळंबा’; सत्ता स्थापनेच्या गोंधळावरून रोहित पवारांचे टीकास्त्र 

दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील रहिवासी असलेले आमश्या पाडवी हे उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार होते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली.

आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते केसी पाडवी यांचा पराभव केला. हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. काँग्रेसचे के.सी. पाडवी सात वेळा विजयी झाले होते.

दोन दिवसांपूर्वी आमश्या पाडवी यांच्या विजयी मिरवणुकीत जोरदार राडा झाल्याचं समोर आलं होतं. रॅलीत सिने स्टाईलने तरुणांनी हाणामारी केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रॅलीत दोन गटात हाणामारी झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube