‘यांच्या खेळात राज्याचा खोळंबा’; सत्ता स्थापनेच्या गोंधळावरून रोहित पवारांचे टीकास्त्र
Rohit Pawar On Mahayuti: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला. महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकल्याने राज्यात महायुतीचीच (Mahayuti) सत्ता स्थापन होणार आहे, हे स्पष्ट झालं. मात्र, मुख्यमंत्रिपदी कोण बसणार याबाबतचा ठोस निर्णय झाला नसल्याने सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
नाना पटोलेंना आरएसएसचा एजंट म्हणे भोवणार; बंटी शेळकेंचे काँग्रेसमधून निलंबन होणार ?
निकाल लागून 8 दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही, यांच्या खेळात राज्याचा खोळंबा होतोय, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
निवडणुकीनंतर #मविआ ला सरकार बनवण्याची वेळ आली असती तर विधानसभेची मुदत संपताच २६ नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावून पडद्यामागून #महाशक्तीने सरकार चालवले असते…. पण आज निकाल लागून ८ दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही.. पण यांच्या खेळात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 30, 2024
महायुतीने महाराष्ट्रातील 288 पैकी 230 विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. भाजप 132 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिंदे गटाने 57 तर अजित पवार यांच्या पक्षाने 41 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं. मात्र, महायुतीची गाडी सत्तावाटपावर अडली आहे. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला गेलेत. सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं. या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यांनी त्यांनी लिहिलं की, निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला सरकार बनवण्याची वेळ आली असती तर विधानसभेची मुदत संपताच 26 नोव्हेंबरनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती. तसेच पडद्यामागून महाशक्तीने सरकार चालवले असते, असं रोहित पवार म्हणाले.
कॉंग्रेसने फक्त तिकीट दिलं अन् नंतर वाऱ्यावर सोडलं, कैलास गोरंट्याल पक्ष नेतृत्वावर संतापले
ते पुढे म्हणाले की, पण, आज निकाल लागून 8 दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही. पण यांच्या खेळात राज्याचा मात्र खोळंबा होतोय, याचं महायुतीला काहीही देणंघेणं नाही, हे दुर्दैवी आहे, असं रोहित पवार म्हणाले.
5 डिसेंबरला शपथविधी…
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाल्याची माहिती दिली. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानवर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बावनुकळेंनी एक्स अकाऊंटवर दिली.