शिंदे गटाच्या अर्जावर वकील देवदत्त कामतांचं उत्तर, ‘तो ईमेल आयडी CM शिंदेंचाच…’

  • Written By: Published:
शिंदे गटाच्या अर्जावर वकील देवदत्त कामतांचं उत्तर, ‘तो ईमेल आयडी CM शिंदेंचाच…’

Mla Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या 16 आमदारांच्यचा अपात्रतेबाबत सुनावणी (mla Disqualification Case) सुरू आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्यावतीने जोरदार बाजू मांडली, ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने 22 जून 2022 ला ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा दावा त्यांनी केला. जेठमलाना यांनी महाराष्ट्र विधानसभेची 2022 ची नोंदवही सादर केली. त्यावर देवदत्त कामत (Devdutt Kamat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला ! 

ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते, तो मेल आडी एकनाथ शिंदे यांचा नाहीच असा दावा शिंदे यांच्या वकिलाने केला. मात्र आता ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट पुरावे सादर केले. ज्या ईमेल आयडीवर आम्ही मेल पाठवला आहे तो एकनाथ शिंदे यांचा खरा ईमेल आयडी असून तो विधानसभा सदस्यांच्या यादीत आहे, असा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. ते म्हणाले, या पुस्तिकेतील एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी eknath.shinde@gmail.com आहे. ज्यामध्ये शिंदे यांचा ईमेल आयडी हा ठाकरे गटाने नमूद केलेल्या आणि त्यासोबत बैठकीसाठी पत्र ज्या ईमेलवर पाठवलं, त्याचं ईमेल आयडीचा संदर्भ या पुस्तिकेत असल्यचाा दावा ठाकरे गटाने केला.

Chhattisgarh : उद्या निकाल, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं PM मोदींना पत्र; कारणही आलं समोर 

ते म्हणाले, ज्यांच्या नावे हा अर्ज केला गेला, त्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं धाडस दाखवलं नाही, असा टोलाही कामत यांनी शिंदे यांचं नाव न घेता लगावला. शिंदे गटाकडून जानेवारी महिन्यातील नोंदवही दाखवण्यात येत आहे. त्यांच्याकडून मे महिन्यात प्रकाशित झालेली नोंदवही दाखवण्यात आली नाही. पहिल्याच पानावर एकनाथ शिंदे यांचा तोच ईमेल आयडी आहे, जो आम्ही सादर केला आहे, असं कामत यांनी सांगितलं.

शिंदे गटाकडून करण्यात येत असलेला युक्तिवाद म्हणजे वेळेचा अपव्यय आणि प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्ट बनावट असल्याचं सांगितलं जात आहे. त्या ईमेलची तज्ञांकडून पडताळणी केली जाऊ शकते. तसेच ज्या लोकांनी तो ई-मेल पाठवला त्यांना सुनावणीला बोलावून विधानसभा अध्यक्षांसमोर ई-मेल उघडून त्याची पडताळणी करा. आम्ही तो ई-मेल पाठवल्याचे सिध्द करू शकतो, शिवाय, अपात्रतेची याचिकाही शिंदे यांना त्याचं ई-मेलवर पाठवण्यात आल्याचंही कामत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube