…त्यांनी नाव घ्यावं, ‘एनसीपी- अलिबाबा आणि चाळीस चोर’, आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा

  • Written By: Published:
…त्यांनी नाव घ्यावं, ‘एनसीपी- अलिबाबा आणि चाळीस चोर’, आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा

Jitendra Awhad : राष्ट्रवादी पक्ष (NCP) चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharadchandra Pawar) हे नाव देण्यात आलं आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.

अपात्र आमदार प्रकरणाचा EC च्या निर्णयाशी संबंध नाही; राहुल नार्वेकरांचं मोठं विधान 

आव्हाड यांनी अजित पवार गटाचा पाकिटमार असा उल्लेख करत टीका केली. काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्दैवाने मनगट आमच्याकडेच राहिलं, असं आव्हाड म्हणाले.

निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष चिन्ह दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, अखेर, सत्य सामोरे आलेच! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत नकळत हे दाखवून दिलं की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नावं मिळालं, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार”. हेच खरे जन्मदाते होते पक्षाच. पण, ढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार हे आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेलं, आता त्यांनी नाव घ्यावे, “एनसीपी- अलीबाबा आणि चाळीस चोर’, असं म्हणत आव्हाडांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.

…मग आरक्षण दिलं तेव्हा भाजपची सत्ता होती का? पाप झाकण्यासाठी कॉंग्रेसवर टीका; वडेट्टीवारांचा हल्लाबोल 

‘या’ तीन नावांचा दिला होता प्रस्ताव
शरद पवार गटाने आयोगाला तीन पर्याय सुचवले होते: नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-एस, असे तीन पर्याय आयोगाला सुचवले होते. या तीन पर्यायांपैकी दुसरा पर्याय आयोगाने मंजूर केला. त्यामुळे शरद पवार गटाला ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असे संबोधले जाईल.

शरद पवार गटाला देण्यात आलेले नवीन नाव 28 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच राज्यसभा निवडणुकीपर्यंतच वैध असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच शरद पवार गट ‘वटवृक्ष’ या नव्या चिन्हासाठी आग्रही असून, लवकरच याबाबत निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube