‘अमृता’हुनी गोड नाम तुझे देवा…; रोहित पाटलांकडून खास उल्लेख, फडणवीसांना हसू आवरेना
MLA Rohit Patil Speech : नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील (MLA Rohit Patil) यांनी आज सभागृहात पहिल्यांदाच भाषण केले. सभागृह अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलण्याची संधी त्यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख करत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. अमृताहुनही गोड तुझे नाव देवा, असं म्हणत रोहित पाटलांनी फडणवीसांचा उल्लेख केला.
रोहित पाटील म्हणाले की, आज या देशाचं वेगळेपण टीकून आहे, त्याच कारण असं आहे की, या देशाने अनेक शाह्या पाहिल्या… पण, या देशाच्या वाट्याला लोकशाही आली, ज्यामुळं संबंध जगात आपला देश वेगळेपण टिकवून ठेवून शकला. त्याचं दुसरं कारण, आपण संसदीय पद्धत कमावली, त्यामुळं लोकशाहीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत. मी तुम्हाला विनंती करेन की, सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान तु्म्ही पटकावला आहे, तसा मी सर्वात तरुण सदस्य म्हणून मान पटकावला. सदनातील या तरुण सदस्याकडे बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. माझ्याकडे लक्ष असावं याचं कारण मी सुध्दा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही कराल, असं म्हणत फडणवीसांना लक्ष्य केलं.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण…
पुढं ते पुढे म्हणाले, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलाय. अमृताहून गोड तुझे नाम देवा, आता संतांच्या वाणीतूनही आपलं नाव गोड पद्धतीने घेतलं गेलंय. पुढच्या काळात काम करताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूक द्याल, अशी विनंती फडणवीसांना केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता आहे. तोच धागा पकडून रोहित पाटील म्हणाले की, अमृताहून गोड मी मुद्दाम बोललो. कारण पुराणातही अमृताचे वेगळं महत्त्व होतं आणि ते आजही आहे, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. फडणवीस यांना देखील स्वतःला यावर हसू आवरता आले नाही.