राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरे गटाचा बहिष्कार, सुनील प्रभू म्हणाले, ‘सरकारने पुढाकार घ्या अन् बेळगावचा प्रश्न…’
Sunil Prabhau : बेळगाव जिह्यात होणाऱ्या महाराष्ट्र एकिकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Committee) महामेळाव्यास कर्नाटक सरकारने (Karnataka government) परवानगी नाकारली. हा महामेळावा दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना बेळगाव सीमेवरच अडवलं. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज राज्यपालांच्या अभिषाणावर बहिष्कार घातला.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण…
सुनील प्रभू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज राज्यपालांच्या अभिभाषनावर आमच्या पक्षाने बहिष्कार टाकलाय,असं सांगत बेळगाव कारवारमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांवर अन्याय होतोय. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
आपची दुसरी यादी जाहीर, सिसोदिया जंगपुरामधून लढणार, अवध ओझा यांनाही उमेदवारी
पुढं ते म्हणाले की, प्रत्येक वेळी राज्यपाल अभिभाषनामध्ये सांगतात की महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आम्ही सोडवू. मात्र प्रश्न सोडवला जात नाही, केवळ जनतेची फसवणूक होतोय. बेळगावमध्ये मराठी माणसांवर कायम अन्याय होतोय. आजही महाराष्ट्र एकीकरण समितीला तिथे मेळावा घेण्यापासून थांबवले गेलंय. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष आहे. सरकार कोणाचेही असू दे. आम्ही बेळगावच्या मराठी माणसाच्या बाजूने आहोत, असं सांगत आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत असल्याचं प्रभू म्हणाले.
गरज पडल्यास आमची शिवसेना बेळगाव-कारवारमध्ये मराठी माणसासाठी जाईलय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेसुद्धा बेळगाव कारवारमध्ये जाऊ शकतात, असं सुनील प्रभू म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. दुसरीकडे, कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय. या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलीस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत. धर्मवीर संभाजी महाराज चौकात सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसेच कोणताही मोठा नेता येथे पोहोचू नये यासाठी कर्नाटक पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे.