तुम्ही सांगा तिथं येतो..,; आरक्षणाच्या जीआरवरुन रोहित पवार मंत्री विखेंना भिडले
तुम्ही मला कुठेही बोलवा, मी सगळी माहिती घेऊन तुमच्याकडे येतो, युक्तिवाद करायला मी तयार असल्याचं चॅलेंज आमदार रोहित पवार यांनी मंत्री विखेंना दिलंय.

Mla Rohit Pawar On Radhakrushna Vikhe Patil : तुम्ही मला कुठेही बोलवा, मी सगळी माहिती घेऊन तुमच्याकडे येतो, युक्तिवाद करायला मी तयार असल्याचं म्हणत मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनाच भिडले आहेत.
पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत युक्तिवाद करायचा असेल तर तुम्ही मला कुठेही बोलवा, मी सगळी माहिती घेऊन तुमच्याकडे येतो.तुम्ही काढलेला जीआर कसा टिकणार,, मराठा समाजाला कशा पद्धतीने तुम्ही न्याय दिला, जीआर उद्या कोर्टात चॅलेंज झाला तर अडचण येणार नाही,याची शाश्वती तुम्ही देणार का? असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी विखेंना केलायं.
“आम्ही कुठे पळून गेलेलो नाही, त्यांचा गैरसमज दूर करू”; रोहित पवारांना विखेंचं सूचक उत्तर
तसेच हा विषय महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुटणार आहे का? या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. मी पुराव्यासकट तुम्ही म्हणाल तिथे चर्चा करण्यासाठी येण्यास तयार आहे. मात्र, तुम्ही तयार आहात का? हे कळवा अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
सर्व मित्र पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. महायुतीने जर एखादा जीआर काढला असेल तर त्याला पाठिंबा सर्व मित्र पक्षांनी द्यायला पाहिजे सर्व मंत्र्यांनी देखील आमदारांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे. मात्र, सध्या मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भाचे क्रेडिट घेण्यासाठी दुसऱ्या मित्र पक्षाला विश्वासात घेता येत नाही घेता येत हे आम्हाला सांगता येणार नाही, अशा शब्दात एक प्रकारे रोहित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये असलेले नाराजी नाट्य ही चव्हाट्यावर आणले.
अजित पवारांना भिडलेल्या अंजना कृष्णा कोण?, काय करतात आई-वडील?, कुठ अन् कसं झालं शिक्षण
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे. त्या डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटलेलाच ठेवायचा म्हणून पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद हा झाला पाहिजे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे मात्र इतिहास बरोबर इतर प्रश्न देखील दुर्लक्षित होतात एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होत आहे लोकांचे हाल होत आहे. आज विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही या मूलभूत विषयांवरती चर्चा करायला सरकार उत्सुक नाही सत्ताधाऱ्यांना केवळ ओबीसीविरुद्ध मराठावाद हाच महत्त्वाचा वाटतोय. मराठी अमराठी व्हेज नॉनव्हेज हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रश्नांमध्येच नागरिकांना गुंतवून ठेवून मूलभूत प्रश्नांना फाटा देण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले.