‘तातडीने शाळेवरती शिक्षक पाठवा’; तहसीलदारानंतर आता शिक्षण अधिकाऱ्याचा नंबर, तानाजी सावंत संतापले!

तातडीने शाळेवर शिक्षक पाठवा, कागदपत्रांचे आम्हा लोकाला काही देण घेणं नसतं, अशा कडक शब्दांत माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी सुनावलंय.

Untitle (9)

Mla Tanaji Sawant : तातडीने शाळेवर शिक्षक पाठवा, कागदपत्रांचे आम्हा लोकाला काही देण घेणं नसतं, अशा कडक शब्दांत माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिक्षण अधिकाऱ्याला सुनावलंय. कालच सावंत यांनी एका तहसीलदारावर संताप व्यक्त केल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर आता शिक्षण अधिकाऱ्याचा नंबर लागला आहे. तानाजी सावंत शिक्षण अधिकाऱ्यावर संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.